विशेष अभिनंदन… पाेलीस, प्रशासकीय यंत्रणेचे!

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
अभिनंदन, कोल्हापूर पोलीस*💐🙏 संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे
काेल्हापूर- शेखर धाेंगडे (पाँझिटीव्ह वाँच टीम)*✍️ एक दाेन दिवस नव्हे तर जशी आचारसंहिता सुरु झाली, तसे किंवा त्याहूनही आधीपासूनच प्रशासकीय यंत्रणेचे काम आटाेपून, नियाेजनबद्ध हालचाली, प्रकीया करून काेल्हापूरसह पाच जिल्ह्यातील पाेलीस आणि प्रशासकीय यंत्रत्रेने अत्यंत जागुरकपणे, कटाक्षाने, संयम राखत, नियाेजनबद्ध दिवसरात्र डाेळ्यात तेल घालून, २४ तास पहारा देत, कार्यालयीन आणि कार्यालयीन बाहेरचे समाजातील कर्तव्य काटेकाेरपणे बजावले आहे. यात सर्वसामान्य कर्मचारी ते शिपाई ते उच्चपदस्थ अधिकारी आणि संपूर्ण पाेलीस यंत्रेनेने अचूकरित्या विधानसभेच्या निवडणुकीचे कर्तव्य पार पाडले आहे. त्याबद्दल त्यांचे पाँझिटीव्ह वाँच मिडीया अँन्ड पाँझिटीव वाँच युथ असाेशिएनच्या टीमच्या वतीने दिलसे अभिनंदन. अभिनंदन. अभिनंदन. 
खरतरं…निवडणूक कोणतीही असो.  याची सर्वस्वी जबाबदारी येऊन ठेपते. ती निवडणूक आयाेग. निवडणूक कार्यालय. जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित सलंग्न अन्य कार्यालये तसेच अतिमहत्वचा दूवा मानला जातो. जिथे कायदा व सुव्यवस्था राखण्याचा कठीण प्रसंग असताे. संयमाची परिक्षा आणि समताेल राखण्याची जिथे भूमिका येते असे पाेलीस विभाग. त्यामुळेच तर काेल्हापूर विधानसभा मतदार संघासह, पाच जिल्ह्याचे प्रमुखत्व, पालकत्व स्विकारलेले  कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारे, कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई यांचेसह पोलीस उपअधिक्षक, निरीक्षक, सहाय्यक निरिक्षक, उपनिरीक्षक, हवालदार, काँन्स्टेबल, होमगार्ड यांच्या नेतृत्वाबराेबरच जिल्हाधिकारी अमाेल येडगे, माहिती कार्यालयाचे, जिथे इंत्यभूत माहितीचा उगम लाेकांपर्यंत पाेहाेचविला जात हाेता अशा विभागाचे सचिन अडसूळ, जिल्हा परिषदेचे कार्तिकेयन, MIDC चे RO उमेश देशमुख,RTO चे प्रादेशिक अधिकारी संजय भोर, चंद्रकांत माने, महापालिकेच्या आयुक्त कें.मंजूलक्ष्मी यांच्यासह याला साथ दिली.
ती अन्य काही विभागांच्या प्रशासकीय, निमशासकीय पब्लिक रिलेशन आँफीसर यांनीही. त्यामुळे सर्व  विभागाचे तरूण तडपडदार व अनुभवी अधिकारी यांच्या समन्वयातून काेल्हापूर विधानसभेची निवडणूक चुरशीची व संवेदनशील विभाग असतानाही ती सुरळीत, शांततते पार पडली. याचे सर्वस्वी श्रेय जाते. त्या या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा व पाेलीस यंत्रणेला. त्यामुळेच त्यांचे अभिनंदन करावे तितके कमीच आहे. 
 वास्तविक पाहता. निवडणूक कोणती ही असो. सर्वात मोठी जबाबदारी  येऊन पडते ती. पोलीस प्रशासनावर. अशा वेळी केंद्रीय मंत्र्यांपासून ते विविध स्तरावरील मंत्री महाेदयांचे दौरे, सभा, बैठका. गावसभा यांची नांदी असते.  यात अनेक ठिकाणी मंत्री दौरा, सभा, मतदान, मतमोजणी, बुथ केंद्र या सगळ्यांमध्ये पोलीसांना महत्त्वाची भूमिका  पार पाडावी लागते. अगदी. नेत्यांच्या संवादापासून, ते सभेतील विविध प्रकारची वक्तव्य जाणून, ती लक्षात ठेवून, त्याची टिप्पणी करण्यापासून ते गाेपनिय अहवाल, अंदाज कसे असतील याची माहिती ठेवण्याचे काैशल्य या पाेलीस यंत्रणेच्या  विविध विभागावर असते. अगदी, सीआयडी, एलसीबी, एलआयबी  च्या विभागापासून सर्वच पाेलीस यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी, खबरी यात सहभागी हाेऊन कर्तव्य पार पाडताना पाहायला मिळाले.
याचबराेबर केवळ कायदा व सुव्यवस्थाच नव्हे तर अवैध धंदे, वाहतूक चाेरटी दारू, पैशाची वाहतूक याकडे ही लक्ष ठेवताना पाेलीस यंत्रणेने चाैफेर यशस्वी कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले.   खासदार की झाली आणि विधानसभा आली. दोन्ही निवडणूका अतिशय संवेदनशीलपणे पोलीस प्रशासन व निवडणूक आयाेग तसेच जिल्हाधिकारी विभागाने हाताळल्या. केंद्रीय मंत्र्याच्या दौऱ्यात तर तब्बल ३० तासापेक्षा नव्हे तर 48 तास पोलिसांनी ड्युटी निभावली. यात वाहतूक शाखेच्या विभागाने तर आपले सर्वस्व काैशल्यपणाला लावत, कर्तव्य बजावले आहे. कशाच्याही अपेक्षा न करता, पाेलिसांनी रस्त्यावर बंदाेबस्ताची भूमिका पार पाडली आहे. याचे सर्व अचूक नियोजन  वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी केले .
काही ठिकाणी तर मतदान प्रक्रीयाच्या ठिकाणीही अल्पसुविधा असतानाही कर्मचारी अधिकारी यांनी आपले कर्तव्य दाखवून दिले. विविध पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक, एलसीबीचे पाेलीस निरीक्षक यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागानेही अनेक गुन्हे उघडकीस आणताना  विविध कारवाई केल्याची आकडेवारीही माेठी आहे. रस्त्यावरचे बंदाेबस्तातील तसेच वाहतूक शाखेचे पाेलीस तर अक्षरक्षः घामेघुम झालेले पहायला मिळाले. 
महिला पोलीस, महिला कर्मचारी यांनीही प्रत्येक ठिकाणी अभिमानास्पद कामिगिरी पार पाडली आहे. घरी लहान मुलं ठेवून त्या कर्तव्य निभावत दिसून आल्या.  पण त्या मनाने खचल्या नाही. ऐन दिवाळी मध्ये निवडणूक लागल्याने घरी कुटूंबासोबत दिवाळी साजरी करण्याचे भाग्य ही पोलीसांच्या पदरी पडले नाही. हेही तितकेच खरं. वास्तविक पाहता. निवडणूक आज लागेल, उद्या लागेल असे म्हणता. म्हणता त्याचा तणाव घेतच, या यंत्रणेने गणपती, दसरा दिवाळी पासून बंदोबस्त ऐके बंदोबस्त…करत अखेर निवडणुकी सारखी देशाची लाेकशाही असलेली उत्सव प्रकीयाही पूर्णत्वाला नेली. त्यांचे विशेष अभिनंदन करावेसे वाटते. वास्तविक पाहता, यात काेणताच शासकीय यंत्रणेचा विभाग मागे नव्हता. आरटीओ विभागाला तर विविध विभागातील चारचाकी गाड्या घेताना अक्षरक्षः दमछाक करावी लागत हाेती. तरीही त्यांनीही त्यात बाजी मारत, सुरेख नियोजन करत अधिकाऱ्यांशी समजूत घालत प्रादेशिक अधिकारी सचिन सागवेकर यांनीही गाड्या मिळवून, निवडणूक प्रकीयेत वाहतूकीची जबाबदारी चाेख पार पाडली. दुसरीकडे राज्य परिवहन मंडळानेही आपल्या हक्काची लाल परी दिमतीला देत, प्रवाशांच्या बाेलणी खात लाेकशाही उत्सवातील आपलाही मदतीचा वाटा उचलताना, डाेंगरदऱ्यातून वाट काढत, ग्रामीण भागातील शेवटच्या टाेकापर्यंत सेवा देण्याचे कर्तव्य निभावले आहे.  त्यामुळे त्यांचेही काैतुक. Midc चे RO उमेश देशमुख यांनीही सर्व कामगार वर्ग मतदान कसे करतील यावर भर देऊन मतदान टक्का वाढविण्यास मदत केली.
ज्या पद्धतीने राजकीय पक्षांचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते आपलाच पक्ष विजयी व्हावा. नेता व्हावा. त्यासाठी जसे जीवाचे रान करतात. खरतर त्यांचेही काैतुकच करायला हवे. आपला नेता… पक्ष, वाढीसाठी. लाेकशाही उत्सव आनंदात व अधिकाधिक मतदान हाेऊन पार पडावा यासाठी जसे झाेकून देतात. तेही या प्रशासकीय यंत्रणेला हातभार लावण्यासारखेच ठरते. असेही म्हणायला काहीच हरकत नाही. जशी प्रशासकीय यंत्रणेने, विविध काँलेज महाविद्यालय, सामाजिक कार्यकर्ते, मंडळ यांनी मतदान जागृती केली तशीच कार्यकर्ते मंडळींनीही मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी कष्ट घेतलेच आहेत. त्यामुळे लाेकशाही उत्सवातील प्रत्येक घटक हा याठिकाणी काैतुकास पात्र ठरताेय. मात्र समाजहिताची. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची ज्यांची खरी जबाबदारी आहे. त्या पाेलीस यंत्रणेला मनापासून धन्यवाद.. 
*कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारे, कोल्हापूर चे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई यांचेसह पोलीस उपअधिक्षक, निरीक्षक, सहाय्यक निरिक्षक, उपनिरीक्षक, हावलदार, काँन्स्टेबल, होमगार्ड या सर्वानी अहोरात्र मेहनत घेऊन कोल्हापूर ची विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडली. आज विजयी आमदारांचे अभिनंदन होत आहे,  सर्वत्र नेतेमंडळी कार्यकर्ते यांच्यात काैतुकांचा वर्षाव हाेताना,  कोल्हापूर पोलीस व प्रशासकीय यंत्रणेला विसरून कसे चालणार. त्यांचे तर विशेष अभिनंदन करणे तितकेच महत्त्वाचे आहे.  किंबहुना प्रत्येक नागरिकांची, कार्यकर्त्यांची तसेच उमेदवाांचेही कर्तव्य आहे. तुमच्यासाठी अहाेरात्र ड्युटी करणारा ताेही एक माणूसच आहे. आणि ताे तुमच्या सुरक्षितेसाठी आपल्या जीवाची बाजी लावून कर्तव्य पार पाडणारा वर्दीतला माणूस आहे.   48 तास अहोरात्र ड्युटी निभावत असताना काय यातना होतात त्या त्यांनाच माहिती, पण त्यांनी कधी बोलून दाखवले नाही. वास्तव समाजासमोर आणणे हे माझं कर्तव्य मी समजतो.  नक्कीचं विधानसभा निवडणूक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडणारे कोल्हापूर पोलीसांचा अभिमान आहे.* 🙏सद्रक्षणाय..खलनिग्रहणाय🙏
जिल्हाधिकारी काय म्हणाले ताेही व्हिडीओ पहा… एक काैतुकाची थाप सारे कष्ट लावते विसरायला..  लिंक ओपन करू पहा…
https://youtu.be/I7ieYjSlHAI?si=xEKeW3Hw8Ur1l1SN
ता. क. जिथे निवडणूक संपताे. ताे क्षण तरअत्यंत महत्वाचा व संवेदनशिल असताे.मतदान प्रकीयेपेक्षा मतमाेजणी व त्यानंतरचा कार्यकत्यांचा उत्साह, मिरवणूक, हुल्लडबाजी., यातून जाे कार्यकर्त्यांचा आनंदाेत्सव असताे. अशावेळी तर पाेलिसांना खूपच संयम बाळगून, कर्तव्य पार पाडावे लागते. नियाेजनबद्ध शिस्त असलेला दाैरा आणि जल्लाेषातील वातावरण हाताळताना अपुऱ्या पाेलिसांची संख्या ती अधिक जाेखीमपणे पार पाडताना. संयमाने हाताळताना दिसली. इथेही त्यांचे काैतुक करावे तितके कमीच. खरतर राजकीय नेत्यांनी जे निवडून आले. त्यांनी निवडणूक काळातील प्रशासकीय यंत्रणेचे व पाेलिसांचे विशेष काैतुक करायलाच हवे. त्यांच्या या सलग राबविलेल्या मेहनतीीच दखल कोठे ना कोठे घ्यायलाच हवी. इतकेच.. 

 

पाँझिटीव्ह वाँच टीम… अँन्ड पाँझिटीव वाँच युथ असोशिएशकडून पुन्हा अभिनंदन व काैतुक.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.