सातारा: एका बाजूला इलेक्शन चे वारे वहात असताना इकडे मात्र, पोलिसांची पथक अलर्ट मोड वर येत थेट ऍक्शन घेताना दिसताहेत. आचारसंहिता सुरू असून, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी थेट पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्याने, पोलीस अधिकारी, कर्मचारी, पथक यांची दमदार कारवाई सुरू आहे.कोल्हापुरात LCB ची मोहीम जोरदार सुरू असतानाच सातारा जिल्हा ही सज्ज होताना, अवैधरीत्या चालणाऱ्या धंद्यावर कारवाई करताना ऐन दिवाळीत धमाका उडवून दिला आहे. जिल्ह्यातील धनगरवाडी (ता. खंडाळा जि. सातारा गावचे हद्दीत)येथे बेकायदेशीर चालणारे जुगार अड्धावर छापा टाकून तब्बल १,०९,२०,०३०/- रुपये किमतीचा रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त केले आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या मार्गदर्शनखाली सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर (अपर पोलीस अधीक्षक सातारा) यांनी सातारा जिल्हयातील स्थनिक गुन्हे शाखा व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना अवैध धंदे, अंमली पदार्थ, अवैध दारु विक्री वाहतूक करणारे इसमांची माहिती प्राप्त करुन त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे काटेकोर पालन करताना कामगिरी यशस्वी केली. दिवाळीची आतिषबाजी सुरू असतानाच पोलिसांची इकडे धरपकड मोहीम सुरू होती. अवैध धंदे सुरू ठेवणारे व त्यात सामील असलेल्या 43 संशयित आरोपींची धरपकड माळच पोलीस पथकाने लावली.
सातारा पोलिसांना गोपनिय विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली नंतर, एक इसम तीन पानी पत्त्याचा जुगाराचा तसेच दारुचा अड्डा धनगरवाडी (ता. खंडाळा जि. सातारा) गावचे हद्दीतील डॉ. जगताप हॉस्पिटलचे पाठीमागे एका पोल्ट्री फार्मचे शेडमध्ये चालवित आहे, असे समजले. यानंतर सुनिल फुलारी (विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर) यांचे सूचनाप्रमाणे पोलीस अधिक्षक समीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वतः तसेच भुईंज पोलीस ठाणे व शिरवळ पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने माहितीच्या आधारे छापा टाकला असता तेथे एकूण ४३ इसम जुगार खेळत असल्याचे दिसून आले.त्यांना ताब्यात घेवून नमुद इसमांचेकडून रोख रक्कम, जुगार साहित्य, विदेशी दारु, बीअर, मोबाईल हेन्डसेट तसेच ६ चारचाकी वाहने व १४ दुचाकी चाहने असा एकूण १,०९,२०,०३० रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नमुद इसमांचेविरुध्द तसेच जुगार अड्डा चालविणारे इसमाचे विरुध्द शिरवळ पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.या यशस्वी कामगिरी नंतर सुनील फुलारी यांनी सर्व अधिकारी, पथक यांच्या कामगिरीवर शाबासकीची थाप मारली.
ही यशस्वी कामगिरी समीर शेख (पोलीस अधीक्षक सातारा ) यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती डॉ. वैशाली कड्डुकर (अपर पोलीस अधीक्षक सातारा,) पोलीस निरीक्षक संदिप जगताप, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्ने तसेच आर.सी.पी. प्लाटून मधील पोलीस अंमलदार व शिरवळ पोलीस ठाणे व भुईज पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांची सदरची कारवाई केली.