ELECTION वंचितांचा सर्वांगीण विकास साधणार – प्रकाश आबिटकर

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

सर्व आंबेडकरी चळवळीचा आमदार आबिटकर यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय – राधानगरी मतदार संघातील प्रमुख दलीत कार्यकर्त्यांची बैठक संपन्न…

गारगोटी प्रतिनिधी – आमदार प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी मतदार संघाच्या इतिहासात आंबेडकरी समाजाचे सर्वाधिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असुन मतदार संघातील सर्व आंबेडकरी जनता आमदार आबिटकर यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला. दरम्यान यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर यांनी वंचीत, आंबेडकरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, पुरोगामी विचारांची जोपासना करण्याची शिकवण माझ्या वडीलांकडून मिळाली असुन आंबेडकरी चळवळीशी माझे जवळचे नाते आहे. त्यांच्या विकासासाठी मी मनापासून प्रयत्न केले आहेत. बजेटचा उपयोग करून जास्तीत जास्त निधी खेचून आणूया. सर्व योजना राबवून समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी काम करूया. शैक्षणिक, व्यवसायाच्या दृष्टीने विकास साधून सगळ्यांसाठी इतिहासात नोंद होईल असे काम करूया. निवडणुकीत सर्व समाज बांधवाना बरोबर घेऊ. विजयाचा गुलाल तुमच्या मुळे मला लागणार असुन यामुळे बुद्धीभेद करणा-यांना चांगलीच चपराक बसेल असे सांगितले. २००४ ते २००९ या काळात आमदारकी केपींच्या डोक्यात गेल्याने त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत.

व्हि. जे. कदम म्हणाले, भाई आनंदराव आबीटकर यांनी माझ्या सारख्या सामान्य माणसाला गारगोटी शहराचे दहा वर्षे उपसरपंचपद भुषविण्याची संधी दिली. माजी आमदार के. पी. पाटील यांच्या कालावधीत आंबेडकर चळवळीतील लोकांसाठी काम झाले नाही. दुसरीकडे मात्र आमदार प्रकाश आबिटकर यांनी गारगोटीत बौद्ध विहार, सालपेवाडी येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी अद्यावत वस्तीगृह, गावा-गावात समाज मंदिरे उभा करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाइक असल्याचे कामातून सिद्ध केले आहे.

प्रा. मिलिंद पांगीरेकर म्हणाले संविधान बदलणार म्हणून भोळ्या-भाबड्या दलीत समाजात चुकीचा संदेश देऊन राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग सुरू आहे. दलीत समाजाने आता जागृत राहण्याची गरज आहे. आजरा सावंत म्हणाले, लोकसभा निवडणुकीत दलीत समाजात संवीधान बदलाचा संदेश पोहचवून स्वार्थ साधून तेतला. दलीत समाजा आता समजले आहे. निरपेक्ष बुद्धीने काम करणाऱ्या आमदार आबिटकर यांच्या पाठीशी राहून त्याच्या विजयाची हॅर्ट्रीक साधू. बाळासाहेब बेलेकर, शांताराम कांबळे, कृष्णात कांबळे यांनी आमदार आबिटकर यांच्या विजयासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखी राबणूक करु अशी ग्वाही दिली.

यावेळी डॉ. दीपक कांबळे, सहदेव कांबळे, कुलदीप कांबळे,रघुनाथ कांबळे, गुरुनाथ चांदम, डी. एस. कांबळे (राधानगरी), श्रीकांत कांबळे, प्रकाश गंगापूरकर, सुरेश जाधव, (भुदरगड) शशिकांत सावंत, अशोक कांबळे (आजरा), एस. पी कांबळे, विनायक कांबळे, संजू राधानगरीकर, विकास कांबळे, राजेंद्र कांबळे, नामदेव कांबळे, मारुती आवळीकर आदींसह मोठ्या संख्येने दलीत बांधव उपस्थित होते. प्रासंगिक चंद्रशेखर कांबळे यांनी केले. आभार नंदकुमार निर्मळे यांनी मानले.

निष्ठावंतांच्या हातात विष्ठा…
उभाटाने दोन महिन्यांत चार वेळा पक्ष बदलणा-या महागद्दारांना उमेदवारी देऊन निष्ठावंतांच्या हातात विष्ठा दिली आहे. याचा हिशेब आम्ही चुकता करु. महागद्दार के. पी. पाटील यांना आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते घरचा रस्ता दाखवतील असे महादेव कांबळे (तळाशी) यांनी सांगितले.

सर्वात स्वस्त आमदार…
असं गाव नाही तिथं प्रकाश आबीटकर यांच नाव नाही. सर्वांच्या मदतीला धावणारा, सामान्यात मिसळणारा, एजी भेट होणारा महागाईच्या काळातील स्वस्त आमदार म्हणून आ. आबीटकर यांचा उल्लेख करावा लागेल असे प्रा. चंद्रशेखर कांबळे यांनी आपल्या भाषणात सांगताच उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.