काेल्हापूर- येथील चंदगड तालुक्यातील शिनाेळी खुर्द येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आणखी एक कारवाई करत, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात तसेच अवैध धंदे बंद करण्यात यश मिळविले आहे. चंदगड तालुक्यातील शिनाेळी खुर्द येथे पत्याचा जुगार खेळणाऱ्या ५० संशयित आरोपींना राेख रकमेसह पकडून त्यांच्याकडून तब्बल सहा लाख ७२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाेलीस निरीक्षक रविंद कळमकर यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार ही कामगिरी यशस्वी पार पाडण्यात आली. या कारवाईत तब्बल ५० जणांना अटक केली आहे. ही कामगिरी यशस्वी करणाऱ्या पथकात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, दिपक घोरपडे, रामचंद्र कोळी, समीर कांबळे, राजू कांबळे, सतिश जंगम, वसंत पिंगळे, महेश आंबी, सागर चौगले व यशवंत कुंभार यांचा समावेश हाेता. सर्फराज निसार ताशिलदार याचे मालकीचे शिनोळी खुर्द, ता. चंदगड येथील दुमजली बंदिस्त इमारत आहे.
याठिकाणी काही लोकांना एकत्र जमवून अंदर बाहर नांवाचा पत्त्यांचा जुगाराचा खेळ खेळत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर संबंधित ठिकाणी छापा टाकला असता येथे जुगार खेळाचा मुख्य मालक रतन शंकर पचेरवाल (वय 66 वर्षे, रा. रेसकोर्स नाका, ताराराणीचौक, संभाजीनगर, कोल्हापूर) व खेळ चालू असले इमारतीचा मालक सर्फराज निसार ताशिलदार (वय 38 वर्षे, रा. प्लॉट नं. 11, चौथीगल्ली, शाहूनगर, बेळगाव) यांना आणि राज्य- कर्नाटक यांचेसह सदर ठिकाणी काम करणारे 05 कामगार व जुगार खेळ खेळणेस हजर असलेले 51 इसम असे एकूण 58 इसमांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांच्याकडून कब्जात रोख रक्कम 1,20,020/- रुपये, 55 मोबाईल हँन्डसेट व जुगार खेळाचे साहित्य असे एकूण 6,78,020/- रू. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला. सर्व इसमांना त्यांचे कब्जात मिळालेले जुगार गुन्हयाचे साहित्यासह चंदगड पोलीस ठाणे येथे हजर करून त्यांचे विरुध्द जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी सध्या निवडणूक कालावधी सुरु असून, सर्वत्र आचारसंहिता लागू असल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी काेल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंदे तत्काळ बंद करावेत, व संबंधितांवर परिणामकारक कारवाई करावी असे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाने अवैध व्यावसायिकांच्यावर कारवाई करण्याचा धडाकाच लावला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या या कारवाईमुळे मात्र अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, यापुढेही अशीच कारवाई सुरु राहणार असल्याचे पाेलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सांगितले.
![]() |
![]() |
![]() |
![]() |