WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

CRIME- LCB; धरपकड सुरूच, साफळ्यात सापडताहेत गुन्हेगार

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

कोल्हापूर: येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची धरपकड मोहीम अजून सुरूच, पाचवी यशस्वी कामगिरी करताना या आठवड्यात पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोटरसायकल चोरटे तसेच पिस्तूल बाळगणाऱ्या संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. कोल्हापूर शहरातील शिरोली एमआयडीसी येथील चोरीच्या 2 मोटर सायकली व गुन्हा करणेसाठी वापरलेली 1 मोटरसायकल अशा एकूण 3 मोटर सायकली जप्त करत एकूण 1,50,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . तर अन्य एका कारवाई मध्ये पिस्तुल जमा करण्याची पाेलिसांनी कामगिरी यशस्वकेली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात वाहन चोरीचे गुन्ह्यांत वाढ झाली आहे. घडलेले गुन्हे उघडकीस आणणेकामी तसेच घडणारे गुन्ह्यांना प्रतिबंध होणे करीता पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारींना मार्गदर्शन करून गुन्हेगारीला अटकाव करणे च्यासुचना दिल्या होत्या. त्या नुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आक्रमक भूमिका घेत एका पाठोपात एक गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले असून मातब्बर गुन्हेगारांची धरपकड केली जात असून, यातून विविध गुन्ह्यांमध्ये आवश्यक असलेले गुन्हेगार सापडत आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांनी त्यांचे शाखेकडील वेगवेगळी तपास पथके तयार करून रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करून तसेच तांत्रीक व गोपनीय माहितीचे आधारे तपास केला जात आहे, यात मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचे प्रयत्न सुरु आहेत. पोलीस अंमलदार युवराज पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळालयांतर, चोरीची मोटर सायकल विक्री करीता एक इसम कसबा बावडा ते वडणगे जाणारे राजाराम बंधारालगत असलेल्या किनारा हॉटेल येथे येणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, या आधारे पोलिसांनी सापळा रचला व यात गणेश संभाजी पोवार (वय 25, रा. पडळ, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) हा अलगद सापडला. यारा विना नंबरप्लेट स्प्लेंडर बाईक सह ताब्यात घेतले. त्याचेकडील स्पेलडर मोटर सायकल ताब्यात घेतली असता, ती चोरीची आढळून आली. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणेस गुन्हा दाखल असलेचे समजले.

आजच लाभ घ्या, गुंतवणूक करा

आरोपी गणेश संभाजी पोवार यास अधिक विश्वासात घेवून त्याचेकडे कौशल्याने तपास केला असता, त्याने शिरोली एमआयडीसी परिसरातून आणखीन एक मोटर सायकल चोरी केलेची कबूली त्याने दिली. ती चोरीची टीव्हीएस स्टार कंपनीची मोटर सायकल जप्त करणेत आली आहे. आरोपी गणेश पोवार याने गुन्हा करणेसाठी वापरलेली स्प्लेंडर मोटर सायकल देखील जप्त करणेत आलेली आहे. या कारवाईत दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित सारे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार युवराज पाटील, रामचंद्र कोळी, सागर चौगले, शुभम संकपाळ, लखनसिंह पाटील, प्रकाश पाटील, कृष्णात पिंगळे, राजेंद्र वरंडेकर यांनी केली आहे.

दुसऱ्या कारवाई मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण ने पिस्टल जप्त करण्याची मोहीम फत्ते केली आहे.

दुसऱ्या कारवाई मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण ने बेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 01 गावठी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र), 03 जीवंत राऊंड व मोपेड असा 1,51,500 /- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या तपासात निवडणूकीची आचार संहिता जारी झालेने अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे, विक्री व तस्करी करणारे इसमांवर कारवाई करणेबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारींना आदेश निर्गमित केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून अवैध अग्निशस्त्रांवर कारवाई करणेच्या सुचना दिल्या होत्या.

 

ही कारवाई करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना कृष्णा सुरेश कलकुटकी (रा. खुपीरे, ता. करवीर) यांचेकडे बेकायदेशीर पिस्टल असल्याची माहिती मिळाली. बुधवारी दुपारी कोल्हापूर येथील वीटभट्टी, दोनवडे फाटा, ता. करवीर येथे विक्रीकरिता पिस्टल व राऊंड आणलेचे समजले. तरी विक्री करणेसाठी येणार आहे अशी खात्रीशीर त्या अनुषंगाने सहाययकपोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांचे समवेत पथक तयार करून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांनी त्यांचे पथकासह बुधवारी दोनवडे फाटा ते साबळेवाडी जाणारे रोडवरील वीटभट्टीचे ठिकाणी सापळा रचला. यामध्ये कृष्णा सुरेश कलकुटकी (वय 38, रा. खुपीरे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यास ताबेत घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात 01 गावठी बनावटीचे पिस्टल, 03 जीवंत राऊंड व अॅक्टीव्हा मोपेड असा एकूण 1,51,500/- रुपये किंमतीचा मुदंदेमाल सापडला. कायदेशीर प्रक्रिया त्यानंतर करुन हस्तगत केला आहे. नमुद इसमाचे विरुध्द करवीर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.