WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

CRIME:कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणची आठवड्यात दुसरी दमदार कामगिरी

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

कोल्हापूर: येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विभागाने कोल्हापूर येथे या आठवड्यात दुसरी कामगिरी करत तब्बल वीस लाख रुपये किंमतीचे 133 ग्रॅम कोकेन जप्त करून,अंमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांना जोरदार हादरा दिला आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंदे अमली पदार्थ साठा आणि गुन्हेगारांचा शोध घेऊन प्रभावी कामगिरी करा, असा आदेश दिल्यानंतर पोलिस यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सापळा रचला असता, येथील जिल्हा परिषद रोड नागाळा पार्क येथे एक युवक संशतीचा फिरताना दिसला. खबरीकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित युवकाकडे चौकशी केली असता प्रथम खरी माहिती देण्यास टाळाटाळ केली मात्र पोलिसांनी पोलीसी खात्या दाखवतच त्याच्याकडे वीस लाख रुपये किमतीचे कोकेन सापडले. या प्रकरणात निलेश राजेंद्र जाधव (वय 40, जुना बुधवार पेठ,कोल्हापूर) त्याच्याजवळ 19 लाख 95 हजार किमतीचे 133 ग्रॅमचा कोकेन हा अमली पदार्थ सापडला. तसेच 20,000 रुपये चा मोबाईल ₹ हँडसेट असा एकूण 20 लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला.पोलिसांनी तो पंचनामा करून रीतसर कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करत, शाहूपुरी पोलीस ठाणे येथे एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की संशयित आरोपी निलेश जाधव हा हे कोकेन अमली पदार्थ मुंबईतून विक्री करण्यासाठी आणल्याचे सांगितले. पुढील तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे हे करत आहेत.
या कारवाईत पोलीस पथक मधील पोलीस अंमलदार विनायक चौगुले, प्रकाश पाटील, अशोक पवार, अमित सर्जे, वैभव जाधव, सुरेश पाटील, रुपेश माने, शिवानंद मठपती, अनिल जाधव, सुशील पाटील, सहभागी होते.

आजच लाभ घ्या, गुंतवणूक करा

, कोकेन घेणारे श्रीमंत घराण्यातले असल्याचे समजते. कोल्हापुरामध्ये सध्या गांजाबरोबर आता कोकेन देखील मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे समोर आले आहे. गांजाची एक पुडी शंभर रुपये ते दोनशे रुपयेला मिळते. चरस एक ग्रामची किंमत हजार ते दीड हजार तीन हजार रुपये च्या घरात विकली जाते. कोकेन प्रति ग्राम 15 हजार रुपये आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही आता अतिश्रीमंत घराण्यातले काही लोक कोकेनचे ग्राहक असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे पोलिसांसमोर हा तपास करून अंमली पदार्थांची विक्री थांबविणे हे एक आव्हान असणार आहे. दरम्यान पोलिसांनी एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा कोकेन सारखी मोती कारवाई केल्याने पोलिसांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे दोनच दिवसांपूर्वी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गांजा पकडला होता.

संशयित आरोपी निलेश जाधव

कोल्हापूर मध्ये कोकेन सापडल्यानंतर निलेश जाधव याला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचे एक पथक मुंबईला तातडीने रवाना झाले आहे. याच्यामध्ये अनेक मोठे गुन्हेगार व मोठे रॅकेट सापडण्याची शक्यता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.

कोल्हापुरात सध्या विविध ठिकाणी अमली पदार्थ विकण्याची मोहीम काही तरुण मुलांनी हातात घेतली आहे. कॉलेज परिसरात आड बाजूला मोकळ्या ग्राउंडवर ही विक्री जोमाने सुरू आहे. गांजा, चरस व आता कोकेन सारखे अमली पदार्थ कोल्हापूर जिल्ह्यात विकले जाऊ लागले आहे, यामध्ये अनेक तरुण मुल नशेच्या आहारी जाऊ लागलेत. या कोकेन जप्तमूळे कोल्हापूरची तरुणाई नेमकी कोणत्या दिशेला चालली आहे , हे स्पष्ट होतेय.

कोल्हापूर मध्ये देखील पंढरपूर सातारा, हैदराबाद इथून गाजांची विक्री करण्यासाठी काही तरुण पुढाकार घेत आहेत. चोरीछुपे हा माल कोल्हापूर शहरामध्ये आणला जात आहे.

चैनीसाठी आणि घर कर्ज संपण्यासाठी निलेश जाधव हा अमली पदार्थ विकण्याचे काम करत होता मित्र व नातेवाईकांच्याकडून घेतलेला उसनवारीचे पैसे फेडणे तसेच शेअर मार्केटमध्ये फायदा मिळवण्यासाठी निलेश जाधव हा कोकेन विकून पैसा मिळवण्याचा झतप्तश्रीमंत होण्याचा प्रयत्न करत होता. लोकांच्याकडून घेतलेला पैशाचा तगादा चुकण्यासाठीच मुंबईत जाऊन थेट कोकेन घेऊन ते कोल्हापुरात विकण्याचे काम निलेश जाधव करत होता.

अमली पदार्थाच्या  कमाईतून श्रीमंत होण्याचा व कर्ज फेडण्याचा निलेश जाधव चा हा फंडा फसला. आणि अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

 

याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहेत. ही मोहीम पत्ते करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मार्गदर्शन केले.

आजच लाभ घ्या, गुंतवणूक करा

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.