महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करा आयटक संलग्न गोकुळ कर्मचारी संघटनेची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मागणी

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

आयटक संलग्न गोकुळ कर्मचारी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) प्रकल्प संचालक जी. पी. बैरवा यांना निवेदन

कोल्हापूर – पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी ते कागलदरम्यान महामार्गाचे रुंदीकरण व इतर कामे सुरू आहेत. गोकुळ शिरगाव परिसरात महामार्गाचे काम सुरू असताना वारंवार अपघात होत असल्याने कामगारांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी आयटक संलग्न गोकुळ दुध संघ कर्मचारी संघटनेने केली आहे.

गोकुळ शिरगाव एमआयडीसी तसेच कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा असते. महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी गोकुळ दूध संघाचे कर्मचारी कै. रामचंद्र सदाशिव पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेनंतर कामगार वर्गात नाराजी निर्माण झाली असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागणीसंदर्भात दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी आयटक संलग्न गोकुळ कर्मचारी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) प्रकल्प संचालक जी. पी. बैरवा यांना निवेदन देण्यात आले. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI कार्यालयात हे निवेदन देण्यात आले.

महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने न केल्यास नाईलाजास्तव राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी लक्ष्मण पाटील, शाहीर सदाशिव निकम, व्ही. डी. पाटील, संभाजी शेलार, दत्तात्रय बच्चे, संदेश पाटील, योगेश चव्हाण, प्रविण करडे, विजयकुमार कांबळे आणि वैभव पाटील उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.