आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नांना यश–वाचा सविस्तर किती निधी मंजूर केला ते…

इचलकरंजीतील राजाराम स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी 5 काेटींचा निधी मंजूर

इचलकरंजी WATCHTEAM  – शहरातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमींचे मुख्य केंद्र असलेल्या राजाराम स्टेडीयमच्या सर्वांगीण नूतनीकरण व आधुनिकीकरणासाठी महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत साेयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद याेजनेअंतर्गत 5 काेटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार राहुल आवाडे यांनी शासन दरबारी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला असून, यातून इचलकरंजी शहरातील क्रीडा जगताला नवसंजीवनी मिळणार आहे.
इचलकरंजीमधील राजाराम स्टेडियम याठिकारी दरराेज शेकडाे खेळाडू, धावपटू, पाेलिस भरतीची तयारी करणारे तरुण-तरुणी तसेच ज्येष्ठ नागरिक सरावासाठी येत असतात. या मैदानावर रणजी ट्राॅीचेही सामने झाले आहेत. मात्र या मैदानाची झालेली दूरवस्था, खेळाडूंसाठी पायाभूत सुविधांचा अभाव, प्रेक्षक गॅलरीची दुरुस्ती यामुळे खेळाडूंची माेठी अडचण हाेत हाेती. त्यामुळे या मैदानाच्या नूतनीकरणाची मागणी खेळाडू आणि विविध क्रीडा संघटनांनी आमदार राहुल आवाडे यांच्याकडे लावून धरली हाेती. त्याची दखल घेत आमदार राहुल आवाडे यांनी संबंधित विभागाकडे स्टेडीयमच्या नुतनीकरण व आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून शासनाने स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी 5 काेटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.
   या अंतर्गत प्रामुख्याने अ‍ॅथलेटिक्स आणि भरती पूर्व सराव करणाèया तरुणांसाठी अद्ययावत ट्रॅकची निर्मिती, विविध स्पर्धांच्या आयाेजनाच्या दृष्टीने प्रेक्षक गॅलरीचे नूतनीकरण व बैठक व्यवस्थेत सुधारणा, खेळाडूंसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम्स, स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याच्या पाण्याची साेय आणि व्यायामशाळेचे आधुनिकीकरण, संपूर्ण परिसराची सुरक्षा व्यवस्था आदी कामांचा समावेश असणार आहे. या निर्णयामुळे इचलकरंजीतील क्रीडा वतुर्ळात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

इचलकरंजीतील राजाराम स्टेडियमने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू दिले आहेत. या स्टेडीयमव पुन्हा रणजीसह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने व्हावेत त्यासाठी स्टेडियमचे आधुनिकीकरण करण्याची स्थानिक क्रीडाप्रेमींची मागणी हाेती. मंजूर 5 काेटींच्या निधीतून खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील आणि कामाचा दर्जा उत्कृष्ट राखण्याकडे विशेष लक्ष दिले जाईल. – आमदार राहुल आवाडे