एकटी” ने दिला आनंद…
कोल्हापूर: इथं बेघर, विधवा, निराधार असे अनेकजण आहेत. त्यांचा सांभाळ करणारी ती “एकटी”आहे. म्हणूनच अनेकजण एकटी वर विश्वास ठेवतात, तिला सारे मिळून साथ देतात. कर्मचारी, पदाधिकारी व दानशूर व्यक्तिमत्वाचे अनेकजण एकटी सोबत असतात म्हणूनच इथं असलेली निराधार, बेघर आनंदित रहातात, वर्षभर आनंदात रहाणारे, हे सर्वजण 10 ऑक्टोम्बर रोजी जागतिक बेघर दिन या दिवशी तरी मागे कसे राहतील बरं!
कोल्हापूर महानगरपालिका “एकटी” संस्था संचलित बेघर निवारामध्ये जागतिक बेगर दिन सप्ताह सांगता समारंभ देखील मोठ्या उत्साहात, जल्लोषात, आनंदात साजरा करताना येथील निराधार, बेघर लोकांना आपुलकीची माया देऊन गेला. इथल्या विशेष आयोजित आपुलकीच्या उपक्रमात जणू काही स्वनात्याचा भासच बेघर, निराधाराना जाणवला. चर्चा, संवादातून मायेचा ओलावा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता, जणू काही इथं ही एकटी संस्था नसून एक उबदार प्रेम माया देणारं कुटुंबच आपल्या साथीला असल्याचे हावभाव, प्रत्येक निराधार व्यक्ती, विधवा व बेघर यांच्या चेहऱ्यावर 10 ऑक्टोबर रोजी जागतिक बेघर दिन सप्ताह उपक्रमाच्या सांगता समारंभ ला होता.
जागतिक बेघर दिन कोल्हापूर महानगरपालिका व एकटी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने झाला. दोन महिला व दोन पुरुष बेघर निवाऱ्यामार्फत दरवर्षी १० ऑक्टोंबर हा जागतिक बेघर दिन साजरा केला जातो. यावर्षी देखील 10 ऑक्टोंबर जागतिक बेघर दिनानिमित्त येथे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविले गेले, त्यात नाच, गाणी, कलागुणांना वाव देण्यात आला.
एकटी संस्था ही बेघर विधवा, निराधार वयोवृद्ध महिला व पुरुषांकरिता कार्य जरी करत असली तरी येथे दाखल निराधार, बेघर यांना केव्हाही एकटी सोबत रहाताना आपण एकटे आहोत याची भावना येथील कर्मचारी, सदस्य, पदाधिकारी जाणवू देत नाहीत. एकटी चे संस्थापक, अध्यक्ष अनुराधा पाटील यांच्या नेतृत्व, मार्गदशनखाली एकदिलाने आपलं कुटुंब, आपला नातेवाईक याच भावनेतून येथे प्रत्येकाला वागणूक देण्याचा कसोशीने प्रयत्न केल्याचे पाहायला मिळते.
एकटी संस्था ही बेघर विधवा परीतकता निराधार वयोवृद्ध महिला व पुरुषांकरिता सात वर्षापासून अविरत कार्यरत आहे.

सध्या कोल्हापूर महानगरपालिका व एकटी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने चार बेघर निवारी कार्यान्वित आहेत. निवाऱ्यामार्फत आठवड्यातून तीन दिवसाने रात्री सर्वे करण्यात येतो. बेघर यांना रेस्क्यू करून त्यांच्या निवाऱ्यामध्ये आणल्यानंतर स्वच्छ आंघोळ घालून त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जातात. निवाऱ्यामधील लाभार्थी कागदी व कापडी पिशव्या बनवून आपल्या कलागुणांना वाव देतात .
घेण्यात आलेले उपक्रम असे
** “आपला कचरा आपली जबाबदारी” या अंतर्गत ड्रायवेस्ट झोनचे उद्घाटन.
*** अथायु हॉस्पिटल मार्फत हेल्थ कॅम्प ला उत्तम प्रतिसाद
** नवदुर्गांचा सत्कार.
. या सांगता समारंभ कार्यक्रमांमध्ये लाभार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. या लोकांच्या मनोरंजनासाठी गाता रहे मेरा दिल हा कराओके कार्यक्रम त्यांच्या मनोरंजनासाठी घेण्यात आला. तसेच स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ कळंबा यांच्याकडून सोंगी भजनी मंडळाचा कार्यक्रम या कार्यक्रमा वेळी सर्व लाभार्थी महिला व पुरुष मनमोकळ्या पणाने आनंदात नाचू बागडू लागले. लाभार्थ्यांसोबत केक कापण्यात आला. सर्व लाभार्थ्यांना फेटे नेसवण्यात आले. त्यांना गुलाब पुष्प देण्यात आला. या कार्यक्रमा वेळी माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर प्रमुख उपस्थित होते. त्यायांनी निवारेतील लाभार्थ्यांचे मनोबल उंचावले व आत्मविश्वास वाढवला. त्यांनी पुढील महानगरपालिकेच्या बजेटमध्ये या निवारण साठी खास वेगळे बजेट आखून विशेष तरतूद करणार अशी ग्वाही दिली .हा कार्यक्रम एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला तसेच को. म. न. पा य एनयू एल एम टी चे व्यवस्थापक रोहित सोनुर्ले,निवास कोळी व समूह संघटक स्वाती शहा, एकटी संस्थेचे संचालक डॉक्टर अमरसिंह रजपूत उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर मधील सर्व दानशूर व्यक्तींनी या कार्यक्रमासाठी हातभार लावला. सरकार प्रतिष्ठान व जॉन भोरे यांनी सर्व लाभार्थ्यांना मोफत अन्नदान सेवा दिली. तसेच कार्यक्रमासाठी लागणारे मंडप डेकोरेशन साऊंड सिस्टिम कराओके कार्यक्रम भजनी मंडळ कार्यक्रम या सर्व सेवा मोफत दान करण्यात आल्या. यासाठी सामाजिक कार्यकर्ते मधुकर मांडवकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सर्व कर्मचारी स्टाफ उपस्थित होते. यासाठी सहकार्य सनी कारंडे व कार्तिकी निगवेकर कर यांचे लाभले सूत्रसंचालन सुरेखा कांबळे व आभार प्रदर्शन जैनुद्दीन पन्हाळकर यांनी केले.