WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा “बिल्डर्स ऑफ नेशन” ने सन्मान

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

शिक्षक म्हणजे निस्वार्थ सेवाकार्याचे मूर्तिमंत प्रतिक… समाजासाठी चालतेबोलते दीपस्तंभच…

कोल्हापूर – दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वाभिमान पेरणाऱ्या ‘हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप’ संस्थेमधील १० शिक्षकांचा रोटरी क्लब ऑफ इव्हॉल्वकडून ‘बिल्डर्स ऑफ नेशन’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, इव्हॉल्वच्या अध्यक्षा सलोनी घोडावत म्हणाल्या की, “आजघडीला समाजामध्ये प्रत्येकजण स्वतः साठी जगण्यात व्यस्त आहेत. पण काही माणसे मात्र इतरांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी जगत आहेत. अशी माणसे म्हणजे आपल्या समाजासाठी चालतेबोलते दीपस्तंभच आहेत.

दिव्यांग लोकांच्या जीवनात सन्मान आणि स्वाभिमानाचा दीप प्रज्वलित करण्यासाठी सतत सेवारत असणाऱ्या हेल्पर्स ऑफ दि हॅंडीकॅप संस्थेमधील अशा शिक्षकांचा गौरव करणे हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि कृतज्ञतेचा क्षण आहे. रोटरी क्लब ऑफ इव्हॉल्वच्या माध्यमातून आम्ही नेहमीच अशा सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेत राहू”. ‘हेल्पर्स ऑफ दि हॅंडीकॅप’ ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापूर मध्ये अपंग पुनर्वसन आणि शिक्षणाचा अत्यंत मूलभूत आणि स्तुत्य काम करत आहे. हे काम करताना अनेक अडचणींवर मात करून येथील विद्यार्थ्याच्या जीवनात चैतन्य आणि आणि आनंद भरणारे येथील शिक्षक म्हणजे निस्वार्थ सेवाकार्याचे मूर्तिमंत प्रतिक आहेत.

त्यांच्या या कार्याचा गौरव करताना या संस्थेतील देवानंद भाडळे, अंजना लागस, मिलिंद गुरव, सचिन वसावे, मोनिका खैरमोडे-गिरीगोसावी, मुग्धा गोरे-लिंगनूरकर, मनोज शेडगे, संजीवनी कोळी, विभावरी सावंत व संदीप मोरे या १० शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला सलोनी घोडावत, डॉ. ममता बियाणी, निलाभ केडिया, निकेत दोशी, निखिल दुल्हानी, निलाभ गोयंका या सोबत कोल्हापूर आणि परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, इव्हॉल्व चे सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.