WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

गोकुळ मध्ये राष्ट्रीय दुग्ध दिन व संविधान दिन

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

डॉ.वर्गीस कुरियन यांना गोकुळ मार्फत अभिवादन …
गोकुळ मध्ये राष्ट्रीय दुग्ध दिन व संविधान दिन साजरा

कोल्हापूर: राष्‍ट्रीय दुग्ध दिन व दुग्धक्रांतीचे जनक डॉ.वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त गोकुळ संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये संघाचे संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते व संघाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत डॉ. वर्गीस कुरियन यांच्‍या प्रतिमेचे पूजन करून त्यांना गोकुळ परिवाराच्यावतीने अभिवादन करण्यात आले व त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचे सामुहिक वाचन करण्यात आले तसेच २६/११ च्‍या मुंबई येथे झालेल्‍या दहशतवादी हल्‍यातील शहिदांना गोकुळ परिवाराकडून आदरांजली ही वाहण्‍यात आली.

 संघाचे संचालक प्रकाश पाटील म्‍हणाले की, श्वेतक्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांची आज १०३ वी जयंती असून २०१४ पासून हा दिवस राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून साजरा केला जातो. गोकुळच्या जडणघडणीमध्ये डॉ.कुरियन यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले असून त्यांच्या विचारानेच गोकुळची वाटचाल चालू असून त्यामुळेच गोकुळची आर्थिक परिस्थिती नेहमीच भक्कम राहिलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शना खाली यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या ऑपरेशन फ्लड योजनेमुळे आज भारत दुग्ध उत्पादनात जगात अग्रस्थानी आहे. त्यांनी सहकारी संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची भावना कायम ठेवली असे मनोगत यावेळी व्यक्त केले.

यावेळी गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, अरविंद जोशी, रामकृष्ण पाटील, जगदीश पाटील, ए.एस.स्वामी, कैलास मोळक, एस.जी.अंगज, व्‍यवस्‍थापक पशुसंवर्धन डॉ.प्रकाश साळुंके, दत्तात्रय वागरे, डॉ.प्रकाश दळवी, संग्राम मगदूम, एम.पी.पाटील, डॉ.कडवेकर इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.