युवा स्पोर्ट्स, गारगोटी मंडळाच्या गणेशमुर्तीचे थाटात आगमण

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कार्यकर्ते, युवा वर्ग व गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी

गारगोटी प्रतिनिधी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर युवा स्पोर्ट्स सार्वजनिक गणेश उत्सव मंडळा, गारगोटी मंडळाच्या श्री गणेशमूर्तीचे भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात थाटात आगमन झाले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया”च्या जयघोषात गणेशमूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान परिसरातील नागरिक व गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मिरवणुकीत मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा वर्ग तसेच गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या तालावर तरुणाईने जल्लोष करत गणरायाचे स्वागत केले. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी गणेशमूर्तीचे विधिवत स्वागत करून स्थापना स्थळी नेले. यावेळी भाविकांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. गणेशोत्सव काळात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली. 

यावेळी मिरवणूकीचा शुभारंभ प्रातांधिकारी हरेश सुळ, पोलीस निरीक्षक संदीप जगताप, जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर, सर्जेराव देसाई, अंकुश चव्हाण, बाजीराव चव्हाण, माजी उपसरपंच अरुण शिंदे, दिपक देसाई, रणधिर शिंदे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.