नागाव तालुका हातकलंगले येथे ग्रामपंचायत मध्ये संविधान प्रधान दिन साजरा
(शिरोली:रुपेश आठवले)-नागाव तालुका हातकणंगले ग्रामपंचायत मध्ये 26 /11 संविधान प्रधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला पुष्पहार लोकनियुक्त सरपंच विमल शिंदे अर्पण केला. व नागावाचे डेप्युटी सरपंच सुधीर पाटील यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमांमध्ये संविधान प्रस्ताविकचे वाचन करण्यात आले.
लोकनिकयुक्त सरपंच विमल शिंदे यांनी संविधान हा लोकशाहीचा गाभा आहे त्या संविधानामुळे मतदानाचा अधिकार मिळाला आहे महिलांना सरकारी व निम सरकारी नोकरीमध्ये विशेष सवलत देण्यात आली आहे त्यामुळे महिला घराबाहेर पडू शकतात तो आपले कौशल्य दाखवू शकतात संविधानाने सगळ्यांना समान अधिकार दिलेले आहेत.
यावेळी नागागावचे डेप्युटी सरपंच सुधीर पाटील, ग्रामपंचायत सदस्या अश्विनी पाटील, सुलोचना कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सागर गुंडाळे, संगीता वायदंडे, तंटामुक्ती अध्यक्ष भरत पाटील, यात्रा कमिटी अध्यक्ष सतीश लंबे ,सुनील कांबळे, विवेक नागावकर, विद्याधर कांबळे, अशोक मगदूम, दीपक लंबे, सामाजिक कार्यकर्ते अनिल शिंदे व ग्रामविकास अधिकारी विठ्ठल कांबळे आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.