काेल्हापूर- येथील एलसीबीची पुन्हा एकदा गुन्हेगारांचा करेक्ट कार्यक्रम करताना अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात यश मिळविले आहे. दाेन अट्टल माेटरसायकल चाेरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ लाख रूपये किंमतीच्या एकूण ७ मोटर सायकली जप्त करून ६ गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना यश आले आहे. पाेलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या नेतृत्वाखाली पाेलीस निरीक्षक रविंद कळमकर यांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणेबाबत आणि घडलेले गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टिने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना वाहन चोरीचे रेकॉर्डवरील आरोपी तसेच वाहन चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देऊन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्या कर्तव्याचे पालन करताना कळमकर आणि त्यांच्या पथकाने यावर साफळा रचून, माेर्चेबांधनी करताना अखेर शाखेकडील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गाेपनिय खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अभिषेक खोत, (रा. गडमुडशिंगे ) व त्याचा एक साथीदार याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अनेक चाेरलेल्या मोटर सायकली जप्त करण्यात आल्या. दरम्यान, या चाेरींचा शोध लावताना
संशययित दाेघे शनिवारी मोटर सायकल विक्री करणेकरिता मुडशिंगे ते हुपरी जाणारे रोडवरील हॉटेल सावली येथे येणार असल्याचे समजले. त्यानंतर येथे पाेलिसांनी पाळत ठेवून,संशयित आरोपी अभिषेक सुरेश खोत ,हर्ष योगेश कोलप दोघे ( रा. गडमुडशिंगे, ता. करवीर) यांना ताब्यात घेतले. यांच्याकडून विक्री करिता आणलेली, विना नबर प्लेटची ०१ स्प्लेंडर मोटर सायकल ताब्यात घेतली. याची सविस्तर माहिती घेतली असता, ती माेटरसायकल गांधीनगर पोलीस ठाणे येथुन चोरीस गेली असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी आणखीन ०५ मोटर सायकली चोरी केल्याची कबुली देवून चोरलेल्या मोटर सायकली दाखविल्या.
याचबराेबर शिरगाव जुना राजवाडा जुना राजवाडा कागल येथेही चोरीला गेलेल्या बाईक पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणला यश आले आहे. ही कारवाईपोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, स.पो.नि. चेतन मसुटगे, तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, संतोष बरगे, परशुराम गुजरे, योगेश गोसावी, महेंद्र कोरवी, प्रदिप पाटील, विशाल खराडे, प्रविण पाटील व कृष्णात पिंगळे यांनी केली आहे.
दरम्यान, दुसऱ्या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने रेकॉर्डवरील दोन आरोपींना अटक करुन दोन गुन्हे उघड करताना त्यांच्याकडून तब्बल 14,00,000/-रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुन्हा एकदा पाेलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशाचे पालन करताना, आपल्या कार्यकर्तत्परतेतून चारचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पाेलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार संजय हुंबे, संजय पडवळ, बसंत पिंगळे, राजू तांकळे, शिवानंद मठपती यांंच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.
पोलीस अमंलदार संजय हुंबे यांना मिळालेल्या पक्क्या माहितीनुसार रेकॉर्डवरील गुन्हेगार दर्शन जाधव, (रा. फुलेवाडी) कोल्हापूर याने व त्याचे साथीदाराने मिळून करवीर पोलीस ठाणेकडील बोलेरो पिकअप या मालवाहतुक गाडीची चोरी हाेती. ती गाडी कात्यायनी मंदीर परिसरात घेऊन येणार आहे हे समजल्यानंतर यात अधिक तपास केला असता, या पथकाने कात्यायनी मंदीराजवळ जावून आरोपी व बाेलेरो पिकअपसह ताब्यात घेतले.
या प्रकरणामध्ये पथकाने दर्शन रमेश जाधव, (वय 22, रा. क्रांतीसिंह नाना पाटील नगर फुलेवाडी रिंगरोड कोल्हापूर) व संतोष सचिन लाड (वय 24, रा. क्रांतीसिंह नाना पाटील नगर फुलेवाही रिंगरोड कोल्हापूर) अशा दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातील कक्षातील महिंद्रा कंपनीची, पांढऱ्या रंगाची बाेलेरो पिकअप मालवाहतुक गाडी ताब्यात घेतली आहे. या चाेरीच्या गाड्या करवीर पोलीस ठाणे तसेच शिरगाव पाेलीस ठाणे हद्दीतील असल्याचे समजले. त्यानंतर संशयित आरोपीकडे अधिक तपास केला असता, त्यांनी आणखीन एक डिझेल जनरेटर गोकुळ शिरगांव परिसरातून चोरला असल्याचे सांगितले.
ही कारवाई देखील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पाेलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष भोरे, पोलीस अंमलदार संजय हुंबे, संजय पडवळ, संजय कुंभार, वसंत पिंगळे, अमित राजें, राजू कांबळे, शिवानंद मठपती, कृष्णात पिंगळे, अमित गर्दाने, प्रविण पाटील, राजेंद्र वरंडेकर व सायबर पोलीस ठाणे कडील रवि पाटील यांनी केली आहे.