WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

…GOOD NEWS- जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
*राजेश क्षीरसागर आणि ललित गांधी यांचा यशस्वी पाठपुरावा  
कोल्हापूर  : जैन समाजाच्या संपूर्ण भारतातील एकूण संख्येपैकी सर्वाधिक म्हणजे ६० लाख इतक्या संख्येने जैन समाज महाराष्ट्रामध्ये राहात असुन, जैन समाजाची देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य ‘महाराष्ट्र राज्य’ आहे.महाराष्ट्रासह देशात सर्वाधिक सामाजिक संस्था चालविण्याची ख्याति असलेला जैन समाज व्यापार-उ‌द्योगामध्येही अग्रेसर असुन सर्वाधिक कर देणारा समाज आहे. मात्र याच समाजात शेतीमध्ये काम करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असुन निम्न मध्यमवर्ग व दारीद्रय रेषेखालील लोकांची संख्या ३० टक्के इतकी आहे.
समाजातील या घटाकांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावे अशी गेली अनेक वर्षांची मागणी होती. याबाबत अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडे निवेदन सादर केले होते.
राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्याची विनंती केली. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत महाराष्ट्रातील जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
***महाराष्ट्रातील जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना करण्याबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या पाठपुराव्यास यश मिळाले.
**  :  राजेश क्षीरसागर म्हणाले
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या जैन धर्मातील महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे व धार्मिक क्षेत्रांचा विकास व संरक्षण, जैन साधु-साध्वी यांची सुरक्षा, जैन धर्म- संस्कृति-साहीत्य यांचे संवर्धन व सुरक्षा, जैन युवकांना उद्यमशीलतेसाठी आर्थिक सहाय्य, जैन विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम या प्रमुख उद्दीष्टांच्या पुर्ततेसाठी जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन्याची आवश्यकता होती. जैन समाजाच्या सभेमध्ये जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते.
याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रातील जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आगामी काळात महाराष्ट्र राज्यातील जैन समाजाच्या उन्नतीचे द्वार खुले झाले असून, निश्चितच याचा लाभ जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुती सरकारने लोकोपयोगी निर्णयांचा धडाका लावला आहे. हे सरकार जनसामान्यांचे हित जपणारे सरकार आहे. लाडकी बहीण, मोफत शिक्षण अशा अनेक लोकोपयोगी निर्णयातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे सातत्याने जनभावनांचा आदर ठेवून कार्यतत्परतेने निर्णय घेत आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुर्घटनेवेळी त्यांनी प्रत्यक्ष भेट देवून निधी देण्याची ग्वाही दिली होती.चार दिवसांपूर्वी रु.२५ कोटींचा निधी मंजूर करून दिलेल्या शब्दांची वचनपूर्ती केली. असे अनेक जनहिताचे निर्णय घेवून सर्वसामान्यांना व सर्वच घटकांना न्याय देण्याऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानत असल्याचेही राजेश क्षीरसागर यांनी  म्हंटले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.