विनायक जितकर
जेष्ट नागरिक समाजसेवा करणाऱ्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या पाठीशी ठामपणे – रविकिरण इंगवले
कोल्हापूर : समाजसेवेचे व्रत घेतलेली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार (उद्धव ठाकरे गट) यांनी केले. उचगाव तालुका करवीर येथे ज्येष्ठ व गरजूंना छत्रीवाटप समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव होते. हिंदू जनजागृती समितीचे किरण दुसे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, जेष्ठ नागरिकांनी आपल्या युवापिढीस धर्माचरण शिकवून सुसंस्कृत पिढी घडवावी या ताण तणावाच्या जीवनामध्ये युवापिढीस त्याचा लाभ होईल तसेच सण उत्सव हे धर्माचरणाप्रमाणे साजरे करावेत.
शहरप्रमुख रविकिरण इंगवले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, तालुकाप्रमुख राजू यादव यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जेष्ठ नागरिकांचा सन्मान पाहून भविष्यामध्ये हे सर्व जेष्ट नागरिक समाजसेवा करणाऱ्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या पाठीशी ठामपणे राहतील असे मत व्यक्त केले. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रास्ताविक गावप्रमुख दिपक रेडेकर यांनी केले व आभार तालुकाप्रमुख राजू यादव यांनी मानले.
यावेळी उंचगाव परिसरातील शंभर जेष्ठ नागरिकांना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उंचगावचे उपसरपंच विराग करी,उंचगावप्रमुख दिपक रेडेकर, उपतालुकाप्रमुख दीपक पाटील, उपजिल्हा समनव्ययक विक्रम चौगुले, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील चौगुले, तालुकाप्रमुख योगेश लोहार, फेरीवाला संघटनेचे वसंतराव मोरे, जेष्ट शिवसैनिक वैभव पाटील, हिंदुत्ववादी शरद माळी, अजित चव्हाण, आबा जाधव, फेरीवाला संघटना तालुकाध्यक्ष कैलास जाधव, युवासेनेचे संतोष चौगुले, युवासेनेचे सचिन नागटीळक, अमर जाधव,बंडा पाटील, शफीक देवळे, बाळासाहेब घुणके, शरद चव्हाण, बाळासाहेब नलवडे आदी शिवसैनिक, पदाधिकारी व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.