शिवसेना ठाकरे गटाचं कोल्हापूर महापालिकेवर हल्लाबोल आंदोलन…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विनायक जितकर

शहरातील रस्त्यांचा मोठा बोजवारा… शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्याची पाहणी करण्याची मागणी…

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यावरून शिवसेना ठाकरे गटानं आज महापालिकेत हल्लाबोल आंदोलन केलं. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फैलावर घेत, खराब रस्त्यावरून कान उघडणी केली. यावेळी प्रचंड घोषणाबाजी आणि वादावादी झाल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं.

खराब रस्त्याचा मुद्दा शिवसेना ठाकरे गटानं उपस्थित करत, अधिकाऱ्यांवर टक्केवारीचा आरोप देखील केला. यामध्ये शिंदे गटातील एक बड़ा नेता असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. ‘उठा उठा दिवाळी आली टक्केवारी घेण्याची वेळ आली’ अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. सध्या शहरातील रस्त्यांचा मोठा बोजवारा उडालाय. रस्त्यावर खड्डे खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झालीय. या विरोधात शिवसेनेनं आज महापालिकेत हल्लाबोल आंदोलन करत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.

टक्केवारीमुळे रस्त्याची कामे दर्जेदार होत नसून ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. अधिकारी चार चाकी वाहनातून फिरत असल्यामुळे रस्त्यावरील खड्डे त्यांना कदाचित जाणवत नसावेत. अधिकाऱ्यांनी दुचाकीवरून फिरूनच शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्याची पाहणी करावी अशी जोरदार मागणी करत घोषणा दिल्यानं तणाव निर्माण झाला होता.

अखेर उद्या बुधवारी शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्डयांची पाहणी करण्याचं आश्वासन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी ठाकरे गट शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, लोकसभा सह संपर्कप्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, विशाल देवकुळे, अवधूत साळोखे, राजू यादव, पोपट दांगट, दिलीप देसाई, राजेंद्र पाटील, विनोद खोत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.