राधानगरी ( विजय बकरे )
राजकीय आकसापोटी व आगामी निवडणुक डोळ्यासमोर ठेवुन मला बदनाम करण्याचे षडयंत्र – राजाराम भाटळे
कथित बनावट नोट प्रकरणाचा सखोल तपास व्हावा
राधानगरी एक हाती घेतलेली सत्ता व जि. प. मतदार संघात केलेल्या निस्वार्थी कामामुळे सामान्य माणसाला काम करत असताना माझ्या विरोधकांनी बनावट नोटा प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर वैयक्तिक पातळीवर आरोप केले जात आहेत. पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मला बदनाम करण्याची व जनतेची दिशाभूल करून संभ्रम निर्माण करण्याचा खटाटोप सुरू केला आहे.अशी माहिती युवा नेते राजाराम भाटळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एका सामान्य कुटुंबातील माझी राजकीय प्रगती विरोधकांना पचनी पडलेली दिसत नाही. सामान्य कुटुंबात असतानाही जनतेचा वाढता पाठिंबा पाहता मला अशा प्रकरणात गोण्याचा प्रयत्न करत असताना २६ जानेवारी रोजी माझ्या भावाच्या रिसॉर्ट परिसरात काही विघ्न संतोषी लोकांनी बनावट झेरॉक्स नोटा आणि जुना प्रिंटर टाकला. तर याच दिवशी संध्याकाळी माझ्या घरावर व भावाच्या रिसॉर्टवर छापा पडला. दरम्यान सदरचा छापा पूर्व नियोजित कट असून. याचवेळी दिवसभर छाप्याची माहिती सोशल मीडियावर फिरत होती. त्यामुळे छापा पडणार ही विरोधकांच्या कार्यकर्त्यांना समजलेच कसे असा प्रश्न निर्माण होतो. तर रिसॉर्ट परिसरात पडलेल्या झेरॉक्स नोटांची मोडक्या प्रिंटरची चौकशी होणे गरजेचे आहे. तरी याचा तपास पोलीस खात्याने करावा अशी विनंती करत राजकीय वैमान्यातून मला बदनाम करण्यासाठी केलेला कट आहे.
व्हिडीओ पहा.. निळ्या लिंकवर क्लिक करा – https://youtu.be/SWpUQ2gMX0c
यामागचा खरा सुत्रधार शोधुन संबंधितावर कायदेशिर कारवाई करावी, मी कोणत्याही चौकशीस तयार असुन प्रसंगी विरोधकांसह माझीही नार्को टेस्ट करणेस तयार असल्याची माहिती युवा नेते राजाराम भाटळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. परिसरात विरोधकांकडुन बेकायदा मटका, अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.दरम्यान बाहेरून आलेल्या जवळपास दिडशे लोकांचा राजकारणात वापर करत बोगस मतदाने नोंदवली गेल्याचा आरोपही भाटळे यांनी केला. यावेळी उपसरपंच डी एस कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष आनंदराव पोवार, बाळासाहेब कळमकर, विठ्ठल चव्हाण, सुजित साळोखे, संजय गोजारे, विकास पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.