WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

तुम्हाला पहायचंय… समुद्राखालील थ्रीलर! तर वेळ राखून ठेवा आजच, ‘गडद अंधार’बघाच ३ फेब्रुवारीपासून

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

सुपर नॅचरल थ्रीलरपट ‘गडद अंधार’ ३ फेब्रुवारीला होणार रिलीज

आज पर्यंत अनेकांनी साऊथ मुव्हीच पाहिल्या. त्यात एकापेक्षा एक वेगळ्या अशा कथानक रसिकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात..त्यामुळे हिंदी चित्रपटापेक्षा आजकाल प्रेक्षक साऊथकडेच जास्त वळताना व बाँक्स आँफीसवर त्यांचे चित्रपट हिट हाेताना आपण पहाताेय. मात्र, आता मराठी चित्रपटाने देखिल सिनेमासृष्टीत उसळी घेतली असून, समुद्राखालची आगळीवेगळी दुनिया आणि विशेष करून थ्रीलरचा आनंद घेता येणार नाही. असा मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच चित्रपट येताेय त्यामुळे हा चित्रपट तुम्हाला पाहायचा आहे, मराठी चित्रपटसृष्टीवरील प्रेम व पाठींबा देण्यासाठी समुद्राखालील थ्रीलरपट साठी ०३ फेब्रुवारीचा वेळ राखून ठेवा. अनेकांच्या पसंतीस पडणारा हा चित्रपट असून, नक्कीच रसिक हा चित्रपट सर्वांना पाहण्यासाठी प्राेत्साहित करतील, असा विश्वास आहे. 

मराठी चित्रपटांनी नेहमीच विविधांगी विषय सादर करत रसिकांचं मनोरंजन केलं आहे. आशयघन कथानकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मागील काही वर्षांपासून मराठी चित्रपट टेक्निकलीही सक्षम बनला आहे. याची प्रचिती वेळोवेळी जगभरातील मराठी रसिकांना आली आहे. ‘गडद अंधार’ हा आगामी मराठी चित्रपट त्या पुढे एक पाऊल टाकणारा ठरला आहे. आजवर मराठी चित्रपटांच्या पटलावर कधीही न दिसलेलं पाण्याखालचं जग ‘गडद अंधार’मध्ये पहायला मिळणार आहे. बऱ्याच रहस्यांचा उलगडा करत एक थरारक अनुभव देणारा ‘गडद अंधार’ हा सुपर नॅचरल थ्रीलरपट ३ फेब्रुवारी २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी इलुला फिचर व्हिजन प्रा. लि.च्या बॅनरखाली ‘गडद अंधार’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मराठीत एक अनोखं धाडस करत दिग्दर्शक प्रज्ञेश रमेश कदम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. फर्स्ट लुक, टिझर आणि नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये ‘गडद अंधार’ची अचूक झलक प्रेक्षकांना पहायला मिळाली आहे. मन मोहून टाकणारी पाण्याखालची सिनेमॅटोग्राफी हे या चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. वरवर निळ्याशार दिसणाऱ्या समुद्राच्या खोल पाण्यात गडद अंधार आहे. या गडद अंधारात बरीच रहस्ये दडलेली आहेत. पाण्याखालच्या अंधारात दडलेलं एक रहस्य जेव्हा जमिनीवरील प्रकाशात येतं तेव्हा काय घडतं ते या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

ताल धरायला लावणारं गायक-संगीतकार रोहित श्याम राऊतचं संगीत या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू आहे. यातील ‘दरिया, दरिया…’ हे गाणं चांगलंच गाजत आहे. ‘गडद अंधार’चं कथानक आजवर कधीही प्रकाशात न आलेल्या पैलूंवर प्रकाशझोत टाकणारं असल्याचे संकेत ट्रेलर पाहिल्यावर मिळतात. दिग्दर्शक प्रज्ञेश कदम यांनी या चित्रपटाच्या निमित्तानं प्रवाहापेक्षा काहीसं वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचंही जाणवतं. या चित्रपटाचं लेखन प्रज्ञेश कदम यांनी लौकिक आणि चेतन मुळे यांच्या साथीनं केलं आहे. चित्रपटातील संवादही अतिशय मार्मिक असून विचार करायला लावणारे आहेत.

वेडेपणा करायला मुहूर्त नसतो… जिनिलिया-रितेश देशमुख लवकरच करणार मोठा धमाका!

‘बिग बॅास’ आणि ‘एमटिव्ही स्प्लिट्सव्हीला एक्स ३’ या रिअॅलिटी शोद्वारे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या जय दुधाणेला मोठ्या स्क्रीनवर पहाणं त्याच्या चाहत्यांसोबतच इतर सर्वसामान्य प्रेक्षकांसाठीही उत्सुकतेचं ठरणार आहे. नायिकेच्या भूमिकेत आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झालेल्या नेहा महाजन यात जयसोबत आहे. त्यामुळे दोघांची केमिस्ट्रीही रसिकांना आकर्षित करणारी ठरेल. थोडक्यात काय तर दर्जेदार निर्मितीमूल्ये, कसदार अभिनय, मुद्देसूद लेखन, कर्णमधूर गीत-संगीत, नेत्रदीपक कॅमेरावर्क, गतीमान संकलन आणि अफलातून दिग्दर्शनाचा उत्तम नमुना ‘गडद अंधार’च्या रूपात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

‘सनी’ …समाजातील कटू वास्तव पहायचे तर ‘सनी’ पहा!

जय-नेहाच्या जोडीला या चित्रपटात शुभांगी तांबळे, आकाश कुंभार, चेतन मुळे, आरती शिंदे, श्री, बालकलाकार अस्था आदी कलाकारही आहेत. रोहितच्या जोडीला जुईली जोगळेकर राऊत आणि दिव्य कुमार यांनीही गाणी गायली आहेत. आदिनाथ पातकर यांनी गाण्याचे संयोजन केले असून, प्रवीण वानखेडे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. सुपर नॅचरल थ्रीलर ‘गडद अंधार’ ३ फेब्रुवारी २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


मराठी माणसांनी प्रथम मराठी चित्रपट पाहायला प्राधान्य दिलेच पाहिजे... POSITIVVE WATCH

 

परीक्षा पे चर्चा .. काेल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांनी साधला असा संवाद! विद्यार्थ्यांमध्ये वाढली आत्मविश्‍वासाची भावना…

 

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.