छोट्या लघुउद्योगातून आंतरराष्ट्रीय स्तरावरचा ब्रँड कसा बनू शकतो याचे मूर्तीमंत उदाहरण चकोते
हे यश सर्व कोल्हापूर वासियांसाठीच नव्हे तर भारतातील सर्व नव उद्योजक, यांच्यासाठी आदर्शवत
स्वतःच्या जोरावर विश्व निर्माण करता येते, शॉर्टकट उपयोगाचा नाही.. कष्टाला पर्याय नाही
काेल्हापूर – (जयसिंगपूर)ःनांदणी सारख्या छोट्या गावात अण्णासाहेब चकोते यानी बेकरी व्यवसाय सुरू केला. गुणवत्ता व विश्वासनियता हे भांडवल मानून चकोते ग्रुपची गणेश बेकरी नांदणी ही मल्टीनॅशनल कंपनी यशस्वी करून दाखवली. मराठी माणसाला हा विकास अभिप्रेत आहे देशाला नोकरी मागणार्या हातापेक्षा काम देणार्या उद्यमशील उद्योजकांची गरज आहे. आण्णासाहेब चकोते यांच्या सारखे पन्नास उद्योजक तयार झाले तर देशाची जी डी पी वाढायला वेळ लागणार नसल्याचे प्रतिपादन केद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी केले.
आजच्या २१ व्या शतकात पैसा उभारता येईल टॅलेंट व टेक्नॉलॉजी मिळेल पण ओनेस्टी इंटिग्रिटी व कॉलिटी या गोष्टी मिळत नाहीत त्या उपजतच असाव्या लागतात. आंत्रप्रीनियर्स साठी कोणतेही विद्यापीठ नाही पण आपल्या स्वतःच्या जोरावर विश्व निर्माण करता येते, शॉर्टकट उपयोगाचा नाही.. कष्टाला पर्याय नाही पण बदलत्या जीवनशैलीनुसार नुसते कष्टच नव्हे तर उत्तम गुणवत्ता, उत्तम प्रॉडक्ट आकर्षक पॅकेजिंग , तसेच बदलते ऍडव्हर्टाइजमेंट स्ट्रॅटेजी हे सर्व देणेही गरजेचे आहे. आणि चकोते या सर्व निकषांवर खरे उतरत आहेत. हे यश सर्व कोल्हापूर वासियांसाठीच नव्हे तर भारतातील सर्व नव उद्योजक, आंत्रप्रीनीयर्स यांच्यासाठी आदर्शवत उदाहरण आहे. छोट्याशा गावातून सुरु झालेल्या छोट्या लघुउद्योगातून आंतरराष्ट्रीय स्तरावरचा ब्रँड कसा बनू शकतो याचे मूर्तीमंत उदाहरण चकोते आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.
नांदणी येथील चकोते ग्रुपच्या गणेश बेकरी नांदणीच्या नव्या अद्यावत प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. या कार्यकर्माचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज तर अध्यक्ष स्थानी नाम. चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने ,खासदार संजय काका पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे , माजी खासदार राजू शेट्टी , माजी आमदार सुरेश हाळवणकर , माजी आमदार सुजित मिणचेकर , माजी आमदार उल्हास पाटील , गणपतराव पाटील, ललित गांधी , बाबा देसाई, बाळासाहेब चकोते, सतीश चकोते यांच्या कुटुंबियासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सुमारे ७५०० वितरक, ग्रामस्थ, कामगार, स्टाफ, हिंतचितक, मित्र परिवार असा सुमारे पंधरा हजार जनसमुदाय उपस्थित होता. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण युटूबवरून लांखो लोकांनी पहिला.
श्रीमंत शाहू महाराज म्हणाले केद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे. चकोते फूड फॅक्टरीच्या प्रॉडक्टमुळे देश विदेशामध्ये आपल्या देशाचे नाव उंचावेल अशी खात्री व्यक्त केली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले गणेश बेकरी प्रकल्प पहिले की , बेकरी व्यवसाय किती अद्यावत बनला आहे हे समजते. अण्णासाहेब चकोते यांनी अनेक हातांना काम दिले आहे उद्योगाबरोबरच शिक्षण आणि समाज सेवेचे कार्य सुरू ठेवले आहे. नांदणीकरांच्या प्रचंड कष्टामुळेच हे प्रकल्प यशस्वीपणे साकारले आहे. या कार्यकर्माचे आभार प्रदर्शन सतीश चकोते यांनी केले.
काेल्हापूरसह राज्याचे नाव उंचावणारा हा प्रकल्प, साकारला चकाैते ग्रुपने– POSITIVE WATCH