WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

शहरातील पाणी प्रश्नावर श्वेतपत्रिका काढा – आपचे प्रशासकांना निवेदन

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

दोन-दोन योजना असून देखील शहर वासियांना अपुरा पाणीपुरवठा

कोल्हापूर – शहराला पाणीपुरवठा करणारी थेट पाईपलाईन योजना, तसेच गरजेच्या वेळी उपयोगात यावी म्हणून राखीव ठेवलेली शिंगणापूर योजना या दोन्ही योजनांमध्ये वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे गेल्या वर्षभरापासून शहरात पाणीबाणी सारखी परिस्थिती वारंवार उद्भवत आहे. तसेच पाणी वितरण यंत्रणेत असलेल्या अडचणी गेले अनेक वर्षे सोडवल्या गेल्या नाहीत. परिणामी दोन-दोन योजना असून देखील शहर वासियांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे.

एकीकडे 90 MLD इतकी गरज असताना 250 MLD इतका प्रचंड पाणी उपसा महापालिकेकडून सुरु आहे. यामुळे पाण्यावर अनावश्यक खर्च होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेतील यंत्रणेला तसेच शहरातील नागरिकांना याची वस्तुस्थिती माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील पाणी प्रश्नावर श्वेतपत्रिका काढवी अशी मागणी आम आदमी पार्टीने प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

यामध्ये अमृत 1 व अमृत 2 योजनांच्या कामाची सध्यस्थिती, योजनेतून केलेल्या बारा टाक्या, संप, क्रॉस कनेक्शन व कार्यान्वित यंत्रणा, थेट पाईपलाईन योजनेतील अडचणी, जसे की ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन मध्ये वारंवार बिघाड होणे, बिल न मिळाल्याने कन्सल्टंट कंपनीकडे दिलेल्या जबाबदाऱ्या पार न पाडणे, योजनेच्या हार्डवेअर सॉफ्टवेअर मध्ये बिघाड झाल्यास त्याचा ऍक्शन प्लॅन असणे, शहरांतर्गत पाणी वितरण व्यवस्थेतील अडचणी, पाणीपुरवठा बंद पडल्यास टँकर द्वारे केले जाणारे नियोजन, शहरातील अनेक ठिकाणी असणारी मोठी गळती, पाणी बिल वसुलीत येणाऱ्या अडचणी, अनधिकृत कनेक्शन शोध मोहिमेसाठी करत असलेल्या उपाययोजना. या सर्व मुद्यांना अंतरभूत करून श्वेतपत्रिका काढल्यास त्यावर काम करणे सोपे होईल. त्यामुळे प्रशासकांनी ही श्वेतपत्रिका काढण्यास मान्यता देऊन पाणी प्रश्न सोडवावी अशी मागणी आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली.

यावेळी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी थेट पाईपलाईन योजनेतील विद्युत लाईन अंडरग्राऊंड करण्यासाठी प्रस्ताव शासनाला सादर केला आहे, शिंगणापूर योजना सक्षम करून थेट पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यास पर्याय म्हणून वापर करण्याचे नियोजन केल्याचे सांगितले. आप पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांवर कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासकांनी जल अभियंता हर्षजीत घाटगे यांना दिल्या. यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.