श्री स्वामी सेवामार्गातर्फे नाशिकमध्ये उद्या १ मे रोजी मूल्यसंस्कार तथा गुरु- मातृ- पितृ पाद्यपूजन सोहळा

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

मूल्यसंस्कार ज्ञानदालने विशेष आकर्षण… उपक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे या विभागाच्या वतीने उभारली जाणारी ज्ञानदालने…

नाशिक – भावी पिढी सुसंस्कारित, निर्व्यसनी, सदाचारी, कर्तृत्ववान आणि आदर्श नागरिक घडावी या उदात्त भावनेतून श्री स्वामी सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे गुरुवार दि.१ मे २०२५ रोजी नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर मूल्य संस्कार मेळावा तथा गुरु – मातृ-पितृ पाद्यपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या उपक्रमाला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मूल्य संस्कार ज्ञानदालने या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

अखिल भारतीय श्री स्वामी सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या पावन सान्निध्यात हा सोहळा होत आहे.सेवा मार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी, युवा वर्गाला योग्य दिशा मिळावी यासाठी बहुविध उपक्रम सातत्याने आयोजित करण्यात येतात. या उपक्रमांचा एक भाग म्हणून १ मे रोजी मूल्य संस्कार तथा राष्ट्रीय महासत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आईवडील हे आपले प्रथम गुरु आहेत. ही आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. आपली भारतीय संस्कृती आणि शिकवण अधिक बळकट होण्यासाठी तसेच”वृद्धाश्रममुक्त भारत” ही संकल्पना समाजापर्यंत प्रसारित करण्याचा उद्देश या उपक्रमातून ठेवण्यात आला आहे.

या उपक्रमाची सुरुवात दि. १ मे रोजी सकाळी ९:३० वाजता गुरुपुत्र आदरणीय श्री नितीनभाऊ मोरे व प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते ज्ञानदालनाच्या उद्घाटनाने होईल.सर्वांसाठी ज्ञानदालने दिवसभर पाहण्यासाठी उपलब्ध असतील. कार्यक्रमाच्या ठिकाणी पालक पाल्य समुपदेशनासह गर्भसंस्कार, शिशुसंस्कार, बालसंस्कार, युवा प्रबोधन, आदर्श पालकत्व, युवा वर्गांसाठी नोकरी- करियर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलेले आहे. दुपारी ठीक २ वाजता सामाजिक संदेश देणाऱ्या भव्यदिव्य संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर वृक्ष- बीजपूजन होऊन वृद्धाश्रममुक्त भारत नाटिका सादर केली जाईल. सायंकाळी ठीक ५:३० वाजता परमपूज्य गुरुमाऊली श्री.आण्णासाहेब मोरे यांचे पावन प्रबोधनपर हितगुज संपन्न होईल.

मूल्य संस्कार ज्ञानदालने प्रमुख आकर्षण

या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे या विभागाच्या वतीने उभारली जाणारी ज्ञानदालने होय. त्यामध्ये ऋषी-मुनींचे वेद- विज्ञान संशोधनाचे सादरीकरण, सात्विक आहार, निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन, युवकांच्या व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, करियर ,नोकरी बाबत अचूक मार्गदर्शन, सण-वार- व्रत-वैकल्यांबाबत भारतीय आणि वैज्ञानिक सादरीकरण, मुलांचा सर्वांगीण आणि पंचेंद्रिय विकासावर मार्गदर्शन, आजीबाईच्या बटव्याचे महत्त्व, भारतीय कायद्यांची माहिती, सेवा मार्गातील सामाजिक उपक्रमांचे सादरीकरण व मांडणी तसेच दहावी, बारावी आणि पदवीनंतर करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तरी या मूल्यसंस्कार मेळाव्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मूल्यसंस्कार मेळावा आयोजन समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.