WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

कोल्हापूर जिल्हा अंतर्गत उपनिबंधक नोंदणी कार्यालयातील गैरकारभारावर तात्काळ कारवाईची करावी

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

कोल्हापूर शहर शिवसेना शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

कोल्हापूर – वाढते नागरीकरण तसेच औद्योगिकीकरणामुळे स्थावर मिळकतींच्या खरेदी- विक्री व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोल्हापुरातील चारही दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी दाखल होणाऱ्या दस्त संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असे असताना नोंदणी कार्यालय, जिल्हा कोल्हापूर अंतर्गत उपनिबंधक करवीर १, करवीर २, करवीर ३ व करवीर ४ कार्यालयात अनागोंदी कारभार सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या गैरकारभाराची तात्काळ चौकशी करून यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली.

यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनामध्ये, भोगवटा नसलेले दस्त नोंदणीस प्रति दस्त रु.५,०००/- ते ३,०००/- रक्कम आकारली जाते. खोटा NA ऑर्डर नक्कल काढण्यासाठी प्रति दस्त रु.५,०००/- ते १०,०००/- रक्कम आकारली जाते. खरेदीपत्र किंवा इतर दस्त, नक्कल काढणेस सरकारी दर प्रती पान रु.५/- असताना रु.१० ते १५/- आर्थिक लुबाडणूक केली जात आहे. इंडेक्स प्रत काढणेस खर्च रु.२५/- असताना रु.१००/- घेतले जातात. साधे खरेदीपत्र – रु.१,०००/- ते २,०००/-, साधे गहाणपत्र – रु.५०० ते १,०००/-, साधे रिकन्व्हेन्स – रु.५००/-, साधे हक्कसोड पत्र – रु.१,०००/- ते ३,०००/-, साधे वाटणीपत्र -रु.१,०००/- ते ३,०००/- अशी जास्तीची रक्कम आकारली जात आहे. करवीर क्र.२ या ऑफिसला नोटरी असलेले वटमुखत्यारपत्र व डेव्हलपमेंट अग्रीमेंट वर दस्त केला आहे. त्यात कदाचित रु.५०,०००/- ते १,००,०००/- इतका भ्रष्टाचार केला गेला आहे. तसेच प्रत्येक ऑफिस शिपाई, क्लर्क, ऑपरेटर व उमेदवार प्रत्येकाला (रु.१००/-, २००/- किंवा ५००/-) रक्कम दिल्यावरच काम केले जाते. जे दस्त प्रोपर येणे ऑर्डर किंवा प्रॉपर्टी कार्ड वर होणे आवश्यक आहे. असे काही दस्त तुकडाबंदीचे दस्त ७/१२ उताऱ्यावर होतात. डुप्लिकेट नकाशे लावून सुद्धा दस्त केले जातात. साधारणत: एक रजिस्टर दिवसाला ४० ते ५० दस्त करतात. प्रत्येक दस्त मागे रु.१,०००/- घेतले तरी दिवसाकाठी रु.४० ते ५० हजार वरकमाई केली जाते. नोंदणी व मुद्रांक विभाग, कोल्हापूर अंतर्गत तुकडेबंदी ले आऊटचे नियमाचे उल्लंघन करून अनेक प्रकरणांची नोंदणी करण्यात आली असल्याचे निदर्शनास येत आहे. गोरगरीब नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करून राजरोज भ्रष्टाचार केला जात आहे. यामध्ये अधिकारी संगनमताने गैरव्यवहार करत असल्याचे दिसून येते. या सर्व कारभारास मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे व चारही उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी लुट थांबविण्यासाठी वरील नमूद सर्व तक्रारींची चौकशी होवून या गैरकारभारास कारणीभूत असलेल्या मुद्रांक जिल्हाधिकारी, कोल्हापूर व नोंदणी कार्यालय, जिल्हा कोल्हापूर अंतर्गत उपनिबंधक करवीर १, करवीर २, करवीर ३ व करवीर ४ कार्यालयातील अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करणेत यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, समन्वयक सुनील जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उदय भोसले, रणजीत मंडलिक, राहुल चव्हाण, गणेश रांगणेकर, राजू पाटील, बाळासाहेब शेलार, कपिल सरनाईक, सुरेश माने, श्रीकांत मंडलिक, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, अशोक माने, किरण पाटील आदी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.