शेतकऱ्यांना संधी… कृषी विभागाकडून निवारण कक्ष सुरु, अधिकार तुमचा!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कृषी विभागाकडून ठोस कारवाई करण्याच्या उद्देशाने तक्रार निवारण कक्ष

कोल्हापूर : जिल्ह्यातील शेतक-यांना निविष्ठा, बी-बियाणे, खते, किटकनाशके यांच्या खरेदी व विक्रीबाबतच्या तक्रारी दूर करण्यासाठी कृषी विभागाकडून ठोस कारवाई करण्याच्या उद्देशाने तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी जिल्हास्तरावरील तक्रार निवारण कक्षात तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी केले आहे.

खरीप हंगामासाठी शेतक-यांकडून बी-बियाणे, खते, किटकनाशके यांची खरेदी सुरु आहे. अशावेळी वितरकांकडून खते, बियाणे, किटकनाशके यांची विक्री जादा दराने होवू शकते. माल असूनही त्याची कृत्रिम टंचाई तयार केली जाऊ शकते. त्यामुळे यासंदर्भातील शेतकऱ्यांना येणा-या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा स्तरावर निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून तक्रार कक्षातील संपर्क क्रमांक – श्रीमती एस. एम. शेटे, कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय- संपर्क क्रमांक- 0231-2652034/ 9049454649 व श्रीमती जी.पी. मठपती, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विभाग- 0231-2655403/ 7385990593 याप्रमाणे आहेत.

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.