काेल्हापूर- जिल्हायातील पट्टणकोडोली गावामधील किराणा दुकानामध्ये तब्बल २ लाख २९ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे रविंद्र कळमकर यांच्या पथकाने केली. पट्टणकोडोली गावचे हद्दीत जाधव गल्ली येथील गणेश मंदिर शेजारी शिंदे किराणा स्टोअर्स आहे. त्या ठिकाणी मोठया प्रमाणावर गुटखा विक्री केली जाते, अशी माहिती मिळाली असता, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली यानंतर पथकाने धाड मारली असता, त्यात २ लाख २९ हजारांचा गुटखा आढळून आला. कायदेशीर प्रक्रीयेनंतर ताे ताब्यात घेण्यात आला असून, या घटनेत संदिप दगडू शिंदे (रा. जाधव गल्ली, गणेश मंदिर शेजारी पट्टणकोडोली, ता हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत हुपरी पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. ही कारवाई पाेलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शानाखाली पाेलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या पथकाने केली. या कारवाई पथकात पोलीस उप निरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार युवराज पाटील, निवृत्ती माळी, अमित सर्जे, राजेंद्र वरांडेकर यांचा समावेश हाेता.
![]() |
![]() |
![]() |