CRIME- मोबाईलमधील तलवारी, पकडल्या बाईकवर

काेल्हापूरः येथे माेबाईलवर धारधार तलवारींचे स्टेटस ठेवणाऱ्या दाेघांना पाेलिसांनी अटक केली आहे.  पाेलिसांनी त्यांच्याकडून १ लाख ६ हजार रुपयांचे धारधार शस्त्र जप्त करण्यात आले आहे. यामध्ये ३ तलवारी, २ यामाहा बाईक यांचा समावेश आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाने पाेलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.  यात उत्तम कांबळे( रा. घुंगुर, ता. शाहूवाडी व प्रविण लोखंडे रा.आमिनी, ता. शाहुवाडी)  अटक करण्यात आली आहे. उत्तम कांबळे हा  त्याच्या मोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवून समाजात दहशत निर्माण करीत  आहेत अशी माहिती मिळाली, तसेच त्याच्या बाईकला त्याने स्टेटसला ठेवलेल्या ३ तलवारी तपास करताना आढळल्या. उत्तम कांबळे हा त्याची बाईक घेऊन गावात फिरत असल्याचे आढळले.  त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाने ही कारवाई केली.

पाेलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी मार्गदर्शन केले. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव, पोलीस अंमलदार सागर चौगले, सुरेश पाटील, रुपेश माने, अमित सर्जे, अशोक पोवार, युवराज पाटील, महेश पाटील, प्रदिप पाटील, विनोद कांबळे व हंबीर अतिग्रे सामील हाेते. या कारवाईत  उत्तम मारुती कांबळे (वय २७, रा. घुंगुर, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) याच्यासह आणखी एक साथीदार प्रविण दौलत लोखंडे (वय २०, रा.आमिनी, ता. शाहुवाडी) यालाही अटक करण्यात आली आहे. 

सर्व जाहिराती एकाच पेजवर पहा, संपर्क साधा…

आजच लाभ घ्या, गुंतवणूक करा