सांगली: जतमधील माजी नगरसेवक विजय शिवाजी ताड (वय ४२ रा. ताड मळा, जत) यांच्या खूनप्रकरणी संशयित बबलु उर्फ संदीप शंकर चव्हाण (वय २७ रा. समर्थ कॉलनी, जत), निकेश उर्फ दाया दिनकर मदने (वय २४ रा. मौजे डिग्रज ता. मिरज), आकाश सुधाकर इनखंडे (वय २४ रा. के एम हायस्कुल जवळ सातारा फाटा, जत), किरण विठ्ठल चव्हाण (वय २७ रा. आर आर कॉलेज जवळ जत) या चौघांना अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. तर सुत्रधार व माजी नगरसेवक उमेश सावंत (रा. जत) हा पसार आहे. पोलीस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली यांनी यांनी याबाबत माहिती दिली.
अधिक माहिती अशी, 17 मार्च रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास विजय ताड हे त्यांचे इनोव्हा गाडी (क्र एम.एच.10 सी.एन.0002) मधून त्यांच्या मुलांना शाळेतून घरी आणणेसाठी जात होते. तेव्हा संशयित बबलु उर्फ संदीप चव्हाण व त्याच्या साथीदारांनी मोटरसायकलवरुन येवुन ताड यांच्यावर पिस्तुलाने गोळीबार करुन अल्फोन्सो शाळेजवळ मोकळया मैदानात त्याचे डोके दगडाने ठेचन त्यांचा खून केला.
अधीक्षक डॉ. बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांना खुनाचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या. निरीक्षक शिंदे यांनी सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, संदीप शिंदे, उपनिरीक्षक विशाल येळेकर अशी वेगवेगळी तीन पथके तयार करून गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश दिले.
पथकांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देऊन तपास चालु केला. सहायक निरीक्षक निशानदार यांनी गोपनीय बातमीदाराकडून व अंमलदार संदीप नलावडे, प्रकाश पाटील यांना तांत्रिक माहिती शयित बबलु उर्फ संदीप शचव्हाण व त्याच्या साथीदार यांनी गुन्हा केला असल्याबाबत माहिती मिळाली.
नेमक्या कारणाचा शोध- माजी नगरसेवक ताड यांचा खून माजी नगरसेवक सावंत याच्या सांगण्यावरुन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खुनामागील नेमक्या कारणाचा तपास सुरु असून त्याकडे लक्ष लागले आहे. |
रेकॉर्डवरील आरोपी
- संशयित गोकाक (कर्नाटक) या ठिकाणी असल्याबाबत माहिती मिळाल्याने श्री. निशानदार व त्यांचे पथक गोकाक येथे दाखल झाले.होऊन आरोपींचा शोध सुरु केला. बसस्थानक परीसरात असल्याचे समजल्याने पथकाने सापळा लावुन पंचासमक्ष त्या चौघांना ताब्यात घेतले. बबलु उर्फ संदीप चव्हाण याने साथीदारांच्या मदतीने उमेश सावंत( रा. जत) याच्या सांगण्यावरून खून केला असल्याचे कबुल केले. बबलु हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारामारी, यासारखे गंभीर स्वरूपाचे 6 गुन्हे आहेत. निकेश मदने , आकाश व्हनखंडे हे देखील रेकॉर्डवरील आरोपी आहेत.
गुन्ह्याचा सुत्रधार उमेश सावंत हा पसार असून त्याचा शोध सुरु आहे. निरीक्षक सतिश शिंदे हे तपास करीत आहेत. कारवाईत निरीक्षक शिंदे, जतचे निरीक्षक राजेश रामाघरे, सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, संदीप शिंदे, उपनिरीक्षक विशाल येळेकर तसेच संदीप नलवडे, प्रकाश पाटील, चेतन महाजन, प्रशांत माळी, ऋतुराज होळकर, विनायक सुतार, नागेश खरात, दिपक गायकवाड, सुनिल लोखंडे, कुबेर खोत, सचिन धोत्रे, राजु मुळे, जितेंद्र जाधव, आमसिध्दा खोत, संदीप गुरव, अनिल कोळेकर, सागर लवटे, बिरोबा नरळे, सागर टिगरे, अच्युत सुर्यवंशी, राजु शिरोळकर, संजय कांबळे, निलेश कदम, राहुल जाधव, सोहेल कार्तीयांनी अमोल ऐदाळे, वैभव पाटील, उदयसिंह माळी, निसार मुलाणी यांच्या पथकाने भाग घेतला.
बनावट नाेटाः VIDEO पहा-पाेलीस यंत्रणांनी याेग्य तपास करावा.. हे तर बदनामीचे षडयंत्र- राजाराम भाटळे
अल्पवयीन मुलांकडून अपघात… पालकांचे दुर्लक्ष!