तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
उपप्रादेशिक परिवहन ची वायुवेग पथकाची धडक कारवाई
रस्त्यावर वाहने चालवणे मुळे अपघाताचे प्रमाण वाढले
शिराळा (जी.जी.पाटील)
अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक रस्त्यावर वाहने चालवल्याने आपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे कारवाई अल्पवयीन मुलांकडुन सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवणेचे प्रकार वाढत चालले असून त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. तरी अठरा वर्षा खालील मुलांना वाहन
सदरची मोहिम सांगली शहर व सांगली जिल्ह्या मध्ये सर्वत्र राबवणार असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे तसेच आपल्या १८ वर्षा खालील मुलांना वाहन चालवण्यास परवानगी देऊ नये, १६ वर्षा खालील मुलांनी वाहन चालवण्याचा गुन्हा केला तर सदर गुन्हया मध्ये दोषी आढळणाऱ्या मुलाच्या पालकांना ३ वर्षे कारावास व २५,०००/- रुपये दंडाची तरतुद मोटार वाहन कायदा मध्ये करण्यात आली आहे. तसेच वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहन चालविल्यास चालकास ५०००/- रुपये व वाहन मालकास ५०००/- रुपये असा एकुण १०,०००/- रुपये दंड अशा शिक्षेची तरतुद मोटार वाहन कायदया मध्ये करण्यात आलेली आहे.तरी पालकांनी व अल्पवयीन पाल्यांनी यांची गांभीयाने दखल घ्यावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली यांच्यावतीने करण्यात आले आहे.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली
चालवण्याचा परवाना नसल्यामुळे वाहने चालवण्याची परवानगी देऊ नये अशा प्रकारचे प्रबोधन गेले दोन महिने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथील अधिकारी वेगवगळ्या शाळा व महाविदयालया मध्ये जाऊन करीत आहेत.
तथापि सदर प्रकारामध्ये घट झाल्याचे दिसुन येत नाही. त्यामुळे मा. जिल्हाधिकारी यांचे कार्यालयामध्ये दि.२ मार्च रोजी झालेल्या बैठकीमध्ये अशा अल्पवयीन चालकांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मा. जिल्हाधिकारी यांचे कडून देण्यात आलेले आहेत. त्यास अनुसरुन आज दि. ०३ मार्च पासून उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वायुवेग पथकाने धडक मोहिम सुरु केली असुन आजरोजी एकुण २० अल्पवयीन वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करुन १२ वाहने जप्त केली आहेत.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.