श्वान रॅम्बो’ च्या सहाय्याने संगमेश्वर पोलीसांनी केला चोरीचा गुन्हा उघड
रत्नागिरी- संगमेश्वर येथील चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. श्वान टॅम्बो याच्या मदतीने चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. संगमेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्यामधील घटनास्थळी, अज्ञात चोरट्याचा सुगावा लावण्याकरिता, रत्नागिटी पोलीस श्वान पथकातील श्वान टॅम्बो यास पाचारण करण्यात आले होते, त्यानुसार घटनास्थळी मिळून आलेल्या वस्तूंचा गंध त्याच्या हँडलेटद्वारे देण्यात आला.
गंध घेताच श्वान टॅम्बोने घटाच्या मागील दरवाजाने बाहेर पडून 360 मिटर च्या अंतरापर्यंत माघ काढून इशारा दिला. ही संपूर्ण प्रक्रिया संपल्या नंतर सहा. पोलीस निरीक्षक, श्री. प्रवीण देशमुख, संगमेश्वर पोलीस ठाणे यांनी या श्वान व तपास पथकास जवळच झालेल्या अन्य एका चोटीच्या गुन्ह्याची माहिती दिली व घटनास्थळी लागलीच जाण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे घटनास्थळी हे पथक पोहचले व श्वान टॅम्बो यास घटनास्थळी मिळून आलेल्या वस्तूंचा त्याच्या हँडलेटद्वारे, गंध देण्यात आला.
गंध घेताच श्वान टॅम्बोने घराच्या मुख्य दरवाजाने बाहेर पडून व आंगणाद्वारे गुरांच्या गोठ्या जवळील पायवाटेने 35 मिटर अंतरावर राहत असणाऱ्या श्री. सोमा विश्राम ओकटे यांच्या घरात जाऊन श्वान हस्तकांना इशारा दिला.
सोमा विश्राम ओकटे यांच्यावर संगमेश्वर पोलीसांचा पूर्वीपासून संशय होताच व श्वान टॅम्बोने यावर शिक्कामोर्तब केले. यावरून संगमेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपी सोमा विश्राम ओकटे यास ताब्यात घेण्यात आले व गुन्ह्यात चोरीस गेला मुद्देमाल 260,000 /- रोख, ही 100 टक्के हस्तगत करण्यात आली आहे.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार श्वान यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. यात प्रवीण देशमुख, स.पो.नि, संगमेश्वर पोलीस ठाणे, श्रीमती. मढवी, स.पो.नि, श्वान पथक, रत्नागिरी, पो. हवा / सचिन कामेरकर, संगमेश्वर पोलीस ठाणे, घुगरे, चालक, श्वान पथक, रत्नागिरी, राणे, श्वान हँडलेट, श्वान पथक, आंब्रे, श्वान हँडलेट, श्वान पथक, व श्वान “टॅम्बो”, श्वान पथक सहभागी झाले होते.
पाेलिसांच्या या कामगिरीचे काैतुक करावे तितके कमीच- POSITIVVE WATCH