रस्त्याच्या खुदाईतून काढले ७ लाख ४० हजार १०० रुपये- काय आहे प्रकरण वाचा सविस्तर- नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी केला उलघडा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

नगरसेवक रविंद्र धंगेकर यांच्या पाठपुराव्याला यश : ग्रामस्थांकडून अभिनंदन!

दौंड -हरीभाऊ बली 

नाथाचीवाडीचे भुमिपुञ पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी ग्रामपंचायतला ७ लाख ४० हजार १०० रुपये महसूल मिळवून गावच्या हद्दीत बेकायदेशीर पध्दतीने चालू असलेले फोर जी अॉप्टिकल फायबर केबल खोदकाम परवानगी न घेता बेकायदेशीररित्या गावात रस्ता खोदून केबल टाकण्याचे काम सुरू होते.हे काम बेकायदेशीर असतांना ग्रामपंचायत प्रशासनाने या बाबीकडे डोळेझाक केली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
नगरसेवक रविंद्र धंगेकर
पुणे महानगरपालिका

ग्रामपंचायत प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने यामध्ये काहीतरी काळेबेरे झाल्याचा आरोप नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी करीत याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

दिलेल्या निवेदनात नाथाचीवाडी हद्दीमध्ये एका नामांकित कंपनीकडून रस्ते खोदून केबल टाकण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.हे करीत असतांना संबंधित कंपनीकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे समजते.तरी सुद्धा शिरजोरपणे संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून रस्त्यांचे विद्रुपीकरण करण्यात येवून केबल टाकण्याचे काम केले जात असतांना सुद्धा त्यांचेवर ग्रामपंचायत प्रशासनाकडून कुठलीही कारवाई न करता एकप्रकारे त्यांच्या या अनधिकृत कामाला अभयच देण्याचे काम सुरू आहे.तेव्हा अशाप्रकारे स्वफायद्यासाठी रस्ते खोदून केबल टाकण्याचे काम करणाऱ्यां कंपनी विरोधात फौजदारी कारवाई करून ग्रामपंचायत हद्दीतील कंपनीने केलेल्या या बेकायदेशीर रस्ता खोदल्या प्रकरणी त्यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी धंगेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी लेखी निवेदनाद्वारे केली होती.

चाळीस वर्षात ग्रामपंचायतील खुर्ची बदलायची झाली नाही ते विकास काय करणारः प्रविण जनगोंडा

रविंद्र धंगेकर यांनी हा अनागोंदी कारभार उघडकीस आणून ग्रामपंचायत नाथाचीवाडी हद्दीतील रस्त्यावर खोदकाम करून रस्ता विद्रुपीकरण केल्याप्रकरणी झालेल्या खोदाईचे मोजमाप करुन ग्रामपंचायतीला ७ लाख ४० हजार १०० रुपये महसूल मिळवून दिला. धंगेकर यांनी हे प्रकरण चौकशीच्या भोवऱ्यात अनंताच ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले. वास्तविक ग्रामपंचायत प्रशासनाने धंगेकर यांच्या पाठपुराव्याच्या अगोदरच कंपनीच्या ठेकेदाराला रितसर परवानगी द्यायला हवी होती,महसूल किती मिळाला हे प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर करायला हवं होतं.परंतु तसे न करता हात ओले करण्याचा प्रयत्न झाला परंतु तो धंगेकर यांनी उघडकीस आणला.सुरुवातीलाच या कंपनीला रितसर जाहीर परवानगी का दिली नाही आणि किती महसूल मिळणार होता हे ग्रामपंचायत प्रशासनाने जाहीर का केले नाही ? हा प्रश्नही अद्याप गुलदस्त्यात आहे.

नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचे नागरिकांना आवाहन —–

दौंड तालुक्यात गावोगावी अनधिकृत केबल खोदाईचे काम चालू आहे.संबंधित कंपनीच्या ठेकेदाराला सरपंच,ग्रामसेवक,गाव पुढारी पाठीशी घालून ग्रामपंचायतचा स्वताच्या फायद्यासाठी महसूल बुडवत आहेत.त्यामुळे ग्रामपंचायतेच्या महसूलाचे मोठे नुकसान होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे.नागरिकांनी आपल्या गावात केबल खोदाईचे काम अधिकृत परवानगी घेऊन खोदकाम सुरू आहे का,त्यातून गावाला किती महसूल मिळाला हे पाहणे जागृत दौंडकरांचे अद्य कर्तव्य आहे असे आवाहन धंगेकर यांनी केले आहे.

प्रत्येक चांगल्या कामसाठी पाँझिटीव्ह वाँच आपल्यासाेबत.. एक पाऊल सत्याकडे.. सकारात्मक बातमीतून प्रगतीकडे वाटचाल

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.