श्री अंबाबाई देवीची प्रतिमा व गोकुळची उत्पादने भेट देऊन केला सत्कार
मुंबई – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दूध संघाच्या नूतन चेअरमन व संचालकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके व आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत गोकुळ दूध संघाचे नूतन चेअरमन व माजी आमदार राजेश पाटील आणि संचालकांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची प्रतिमा आणि गोकुळची दुग्ध उत्पादने भेट देऊन सत्कार करण्यात आला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेल्यांमध्ये गोकुळ दूध संघाचे नूतन चेअरमन व माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह अजित नरके, अंबरिषसिंह घाटगे, कर्णसिंह गायकवाड, चेतन नरके, अमरसिंह पाटील, रणजितसिंह कृष्णराव ऊर्फ के. पी. पाटील, राहुल पी. एन. पाटील, विरेंद्रसिंह मंडलिक, मदन देसाई, अजित पाटील, रणजितसिंह पाटील (शिरोळ), कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांचा समावेश आहे.



























