डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

पृथ्वीराज संजय पाटील यांच्या हस्ते विजेतेपदाचा चषक स्वीकारताना फिजिओथेरपी संघाचे खेळाडू, समवेत डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. व्ही. व्ही. भोसले, अभय जोशी आदी.

कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा 2025-26 मध्ये दमदार 109 गुणांची कमाई करत फिजिओथेरपी कॉलेज संघाने सलग दुसऱ्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. 

विजेत्या संघांना डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील आणि कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांच्या हस्ते चषक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. फिजिओथेरपी कॉलेजची श्रावणी अशोक जंगटे आणि स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचा सोहम राजेश शिंदे यांना ‘उत्कृष्ट खेळाडू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, “क्रीडा स्पर्धा म्हणजे केवळ जय-पराजय नव्हे, तर नेतृत्व, शिस्त आणि संघभावना शिकवणारे प्रभावी व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी खेळातून आत्मविश्वास, तंदुरुस्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करावा. पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून स्पर्धेला नव्या उंचीवर न्यावे. कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी सांगितले, “विद्यापीठाच्या आठ संस्थांमधील तब्बल 870 खेळाडूंनी सांघिक व वैयक्तिक अशा 10 विविध क्रीडा प्रकारांत सहभाग घेतला. शिक्षणाबरोबरच खेळ, एनएसएस, एनसीसी आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो. खेळ विद्यार्थ्यांमध्ये निर्णयक्षमता आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करतात.

या स्पर्धेदरम्यान विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू व संघांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जगमे, डॉ. आर. एस. पाटील, डॉ. ए. एम. गुरव, डॉ. एस. एस. पाटील, डॉ. ग्रंथेज ओतारी, डॉ. मनीषा विजापूरकर, क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, सुशांत कायपुरे यांच्यासह सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व क्रीडा विभागप्रमुख उपस्थित होते. शंकर गोनुगडे यांनी आभार मानले. विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष सतेज पाटील आणि विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी विजेत्या संघांसह सर्व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.