कोल्हापूर प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्यातील शेतकरी कर्जमाफी प्रमाणे गोरगरीब कष्टकरी मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज अनुदान देऊन उद्योग व्यवसाय निर्मितीची संधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे परंतु कोरोना सारख्या जागतिक महामारीनंतर असे लहान उद्योग चालवणे कठीण झाले आहे जगण्याचे संदर्भ बदलले आहेत त्यामुळे कर्ज थकले आहे म्हणून आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी करत आहोत की राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफी जाहीर केली आहे.
त्याचप्रमाणे गोरगरीब कष्टकरी मागासवर्गीयांची ही कर्जमाफी करावी त्यामध्ये महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ संत रविदास आर्थिक विकास महामंडळ मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ अपंग आर्थिक विकास महामंडळ जिल्हा खादी ग्रामोद्योग महामंडळ तसेच महिला आघाडी स्वयंसेवी बचत गटाचे औद्योगिक कर्ज माफ करावे तसेच अनुसूचित जाती नवबुद्ध भूमी हिनांकरता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत राबवली जाते परंतु योजनेचे निकष अत्यंत जाचक असल्याने त्याचा लाभ लाभार्थ्यांना होत नाही म्हणून या योजनेतील दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी व अन्य जाचक अटी काढून टाकण्यात व योजनेचेच सबलीकरण करताना जमीन बाजारभावाप्रमाणे शासनाने घेऊन द्यावी तसेच राज्य शासनाने अनुसूचित जाती जमातीच्या कल्याणकारी जाहीर केलेल्या योजनांचा उपाय योजनेचा निधी अप्रत्यक्ष खर्च करू नये मागासवर्गीयांचा निधी अन्यत्र खर्च न करता कर्नाटक शासनाप्रमाणेच कायदा महाराष्ट्र शासनाने ही करावा तसेच राज्याने केंद्र शासनाच्या अखत्यारातील बौद्ध लेण्यांचे पुरातत्व खात्यामार्फत संशोधन व संवर्धन करणे जसे पन्हाळगडाच्या पश्चिमेला विस्तीर्ण अशा पठारावर सम्राट अशोककालीन बौद्ध लेणी आहेत.
कुशिरे पोहाळे तालुका पन्हाळा चक्रेश्वर वाडी तालुका राधानगरी बौद्ध गार्डन शास्त्रीनगर कोल्हापूर व अन्य बौद्ध स्थळांचे राष्ट्रीय पर्यटन केंद्र म्हणून विकसित करावे तसेच कोल्हापूर शहरातील जुने शाहूपुरी पोलीस स्टेशन हे छत्रपती शाहूकालीन हुजूर बंगला म्हणून ऐतिहासिक वस्तू आंबेडकरी जनतेला अंधारात ठेवून रातोरात पाडली आहे हा हुजूर बंगला लोकराजा छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर च्या भेटीने पावन झालेले स्थळ आहे या जागेवर शाहू भीम स्मारक उभारावे व सध्या या पवित्र स्थळाची झालेली दुरावस्था आम्हा शाहू भीम प्रेमी जनतेला वेदना देतात याची दखल घ्यावी व योग्य उपाय योजना करावी तसेच गायरानातील अतिक्रमण कायम करताना सन २०११ पर्यंत सर्वच प्रकारचे अतिक्रमण जसे निवास छोटा व्यवसाय,शेती,गोठा शेतातील शेड असे गोरगरिबांचे भूमिनांचे सर्व प्रकारचे अतिक्रमण कायम करावे व तसेच मार्च २०२६ पर्यंतचे अतिक्रमण नियमानुकुलन करावी तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारावा तसेच सर्वच विद्यार्थ्यांना महागाई निर्देशांकाप्रमाणे शिष्यवृत्ती द्यावी, स्वाधार योजना सक्षम करावी प्रत्येक विद्यार्थ्यांची निवासी भोजन व्यवस्था शिक्षण पूर्ण होईपर्यंत शासनाने करावी तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लाभार्थी अर्थसहाय योजनेमध्ये राष्ट्रीयकृत आणि शेड्युल्ड बँकांकडून मागासवर्गीय यांच्यावर अन्याय होत आहे.
पंतप्रधान रोजगार योजना पीएमईजीपी व मुख्यमंत्री रोजगार योजना सीएमईजीपी तसेच विविध मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाकडून मंजूर झालेले प्रकरणे बँकांकडून केवळ मागासवर्गीयां चे प्रस्ताव नाकारले जातात ही बाब चिंताजनक आहे. दिलेले टास्क बँकेकडून वेगवेगळ्या अर्थाने पूर्ण होतात कृपया आम्ही विनंती करतो की यासंदर्भात जिल्हाधिकारी महोदयांनी एक संयुक्त बैठक शिखर बँक प्रमुखांसह सर्व बँकांच्या प्रतिनिधींना बोलावून घ्यावी तसेच सध्या जनगणनेचे काम सुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे या कार्यास प्रत्येक भारतीयांनी योग्य माहिती देऊन स्वतःचे नाव राष्ट्रीय जनगणनेमध्ये नोंद करावे असे आम्ही आव्हान करत आहोत की धर्म या कॉलम चौकटीमध्ये बौद्ध धर्म असल्यास उप कॉलम मध्ये जातीची आवश्यकता नाही असे आम्हा सर्व अनुसूचित जाती बौद्ध बांधवांचे म्हणणे आहे कृपया योग्य ते आदेश जाणीवपूर्वक कर्मचारी यंत्रणेला व्हावेत या मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या दारांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
संपूर्ण परिसरामध्ये घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले यावेळी या सर्व मागण्यांचे निवेदन मा. जिल्हाधिकारी राठोड साहेब यांना देण्यात आले हे आंदोलन रिपब्लिकन पक्षाचे संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे तसेच राज्याचे सचिव बीके कांबळे, यांच्या मार्गदर्शन तसेच रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष आयु. दत्ता मिसाळ(आण्णा), रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव आयु सतीश माळगे(दादा), यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते किरण नामे, राधानगरीचे कुंडलिक कांबळे,कागल तालुक्याचे बाबासाहेब कागलकर, वाहतूक आघाडीचे सलमान मौलवी, गडहिंग्लजचे अप्पू मांग, प्रवीण आजरेकर,अलंकार माने,केरबा मयेकर,साताप्पा हेगडे,सुशांत खाडे, मलिक चिकदोळ यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.























































