WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

कणेरी मठः १०० कमिट्या पाहताहेत अशी कामं…‘लोकसहभागा’ने होणार लोकोत्सव ‘सुमंगलम्’– 50 लाखांचा आकडा हाेईल पार!

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

लोकसहभागा’ने होणार लोकोत्सव ‘सुमंगलम्’
कोल्हापूर
एक किलो प्लास्टिक कचरा, खराब साड्या, ताट-वाटी-तांब्या देण्याच्या आवाहनाला मिळत असलेला मोठा प्रतिसाद, गावागावातून शिधा जमा करण्यासाठी सुरू झालेली लगबग, उत्सवकाळात रोज तीन-चार लाख भाकरी देण्याचे झालेले नियोजन,  बाहेरून आलेले साधुसंत, भक्तगण यांना परिसरातील घराघरात राहण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार, पार्किंग, रस्ते यासाठी शेतकऱ्यांनी खुली करून दिलेली शेती अशा विविध निर्णयासह अनेक उपक्रमातून पंचभूत महोत्सव हा खऱ्या अर्थाने लोकोत्सव होणार आहे. मठाधिपती पूज्यश्री काडसिद्धेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी हजारो हात आणि शंभरावर कमिट्या कार्यरत आहेत.

पर्यावरण वाचविण्याबरोबरच निरोगी पिढी घडविण्यासाठी येत्या २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान पंचभूत महोत्सव होत आहे, तो खऱ्या अर्थाने लोकोत्सव व्हावा यासाठी गेले दोन महिने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या महोत्सवाचे संयोजन कणेरी सिद्धगिरी मठ महासंस्थान करत असले तरी संयोजनातील घटक मात्र केवळ परिसरातील ग्रामस्थच नव्हे तर महाराष्ट्र आणि कर्नाटकसह विविध राज्यातील भक्तगण करत आहेत. हा आमचा लोकोत्सव आहे, ही भावना प्रत्येकांच्या मनात असल्याने दोन महिन्यापासून सारे मनापासून आपलं योगदान देत आहेत. मठावर येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे योगदान या महोत्सवात राहील, यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत, यामुळे हा खऱ्या अर्थाने लोकोत्सव होणार आहे.

कणेरी मठः ऐकावं ते नवलच ! देशातील पहिलेच प्रदर्शन..तब्बल ६९ लाखाची बक्षीसे, पहायला विसरू नका गाढवांचे प्रकार

गावा गावात ठरताेय हा निर्णय

   महोत्सवादरम्यान, सात दिवसात मठावर पन्नास लाखांवर लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे. यामुळे कोणाचीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली आहे. रोज पाच लाखांवर लोकांना मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे. यासाठी पत्रावळ्या अथवा प्लास्टिक न वापरण्याचे ठरले आहे. म्हणून  भक्तांनी ताट-वाटी आणि तांब्या द्यावे असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार मठावर रोज शेकडो ताट-वाट्या येत आहेत. सुशोभिकरणासाठी जुन्या साड्यांचा वापर करण्यात येत आहे. यासाठी महिलांकडून रोज हजारो साड्या दिल्या जात आहेत. आलेल्या लोकांना रोज काय जेवण द्यायचे, त्यामध्ये आपण कोणता पदार्थ द्यायचा याचा निर्णय गावागावांनी घेतला आहे. याशिवाय प्रत्येक घरातून सात दिवस चार ते पाच लाख भाकरी येणार आहेत.

कणेरी मठावर पर्यावरण जनजागृतीचे महत्त्वाचे काम-मालोजीराजे छत्रपती

पार्किंगसाठी शेतकऱ्यांनी दिल्या शेतजमिनी

सध्या शिधाही मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. त्यासाठी विविध जिल्ह्यातील संयोजन कमिट्या कार्यरत आहेत.
या उत्सवासाठी पंचवीस राज्यातून भक्तगण येणार आहेत. त्यातील बहुतांशी लोकांच्या राहण्याची सोय परिसरातील गावांत असलेल्या घराघरात करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला आहे. मठावर प्लास्टिक कचऱ्याचे विघटन करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येकांनी एक किलो कचरा आणावा असे आवाहन केले आहे.  महोत्सव काळात परिसरात मोठी गर्दी होणार असल्याने रस्ते रूंदीकरण करण्यात येत आहे, त्यासाठी अनेकांनी आपली जमीन दिली आहे. पार्किंगसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी आपले शेत मोकळे करून दिले आहे.

कणेरी मठात राबविला जाताेय… आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचावणारा ‘सुमंगलम पंचमहाभूत लाेकाेत्सव’- काय काय आहेत वैशिष्ट्य पहा.. सर्वांनी पहावा असाच हा लाेकाेत्सव

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.