सिध्दगिरी मठ – कणेरी येथील ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव ‘ राष्ट्रीय सह आंतरराष्ट्रीय पातळीवर – -अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजी –
पाच डोम सह गुरुकुल विद्यालय येणार अनुभुती – कोल्हापूरसहमहाराष्ट्र ची ठरणारी व्यापक विधायक ओळख – शिवजंयती दिनी भव्य शोभायात्रा – पंचगंगा नदी महाआरती
कोल्हापूर / कणेरी सिद्धगिरी मठ कणेरी येथे येत्या २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान होत असलेला ‘सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला असून त्यामुळे कोल्हापूरसह महाराष्ट्र राज्याची एक वेगळी विधायक आणि व्यापक ओळख निर्माण होईल असा विश्वास परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केला .या लोकोत्सवाच्या मध्यवर्ती संकल्पनेनुसार ‘आकाश – वायू – अग्नी जल आणि पृथ्वी या पंचमहाभूतांच्या प्रांरभापासून आजच्यापर्यंतची प्रवास रचना मानवाच्या अतिरेकी वापरामुळे झालेली दुरावस्था आणि आगामी काळातील धोके व घेण्याची दक्षता या संदर्भाने प्रबोधन पर असे हे पाच ड्रोम हे सर्वांचे लक्षणीय अशी आणि ज्ञानात भर घालणारे असे ठरणार आहेत .यासह लॉर्ड मेकॉलेची शिक्षणपद्धती सोडून कुठलीही नोकरी न मिळणारी पण शंभर टक्के स्वयंपूर्ण बनवणारी शाळा म्हणजे अनोखे गुरुकुल विद्यालय कणेरी मठावर सुरु आहे . ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ मध्ये याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
- गेल्या दोन वर्षापासून हे काम सुरु आहे. एका मूर्तीची किमत ४० ते ५० हजार रूपयांच्या घरात असून उन पाऊस झेलत शेकडो वर्ष या मुर्त्या टिकून राहतील असा विश्वास मठाच्या प्रशासनाला आहे.सहाशेच्या वर मुर्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सिद्धगिरी कणेरी मठावर सुरु असणाऱ्या अनोखे गुरुकुल विद्यालयामध्ये चार वेद,सहा शास्त्र आणि ६४ प्रकारच्या कला शिकविल्या जातात . ब्रिटिश प्रभावी मेकॉले शिक्षणपध्दतीने परस्पर संवाद नाहीसा झाला आहे कुटुंबव्यवस्था व सामाजिक जीवन उद्धवस्त होत आहे आणि केवळ चाकरमाने निर्माण झाले.शंभरातील केवळ तीन ते पाच जणांनाच नोक-या मिळतात. त्यावर हा एक कृतीशील प्रभावी प्रयार्य आहे.
स्थानिक ते वैश्विक सहभागा या खऱ्या अर्थाने लोक उत्सव सोहळा संपन्न होत आहे यामध्ये सध्या कणेरी मठ परिसरात पंचक्रोशीतील विविध संस्था तरुण मंडळी महिला बचत गट उस्फूर्तपणे येऊन श्रमदान करीत आहे या स्थानिक सहभासद सहभागासह देशविषयी विदेशातील विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी शासकीय अधिकारी व संशोधन संस्था याही कार्यरत आहेत अशा तऱ्हेने हा ग्लोबल टू लोकल असा लोकोत्सव सोहळा होणारा शोध यामुळे कोल्हापूरची महाराष्ट्राला एक वेगळी विधायक ओळख निर्माण होईल त्यासाठी सर्वांनी आपले यथाशक्ती योगदान आपले आवडी व क्षमनेनुसार द्यावे .
– श्री अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजी . स्वामीजी,कणेरी मठ
- गोपालक, एक हजार वर्ष टिकणारे घर बनवणारा इंजिनिअर,प्रक्रिया उद्योजक,व्यायसायिक,शिल्पकार,ज्वेलर,संगीतकार, पाकशास्त्र, ज्योतीषशास्त्र (खगोलशास्त्र),हवामानशास्त्र,हॉर्स व बुल रायडींग,इतिहास, पाठांतर (आयुर्वेदाचे श्लोक),शिल्पवेद,धनुर्वेद,गंधर्ववेद ,युध्दकला,मॅनेजमेंट,नॅचरल सायन्स, वेदगणित, ब्युटीपार्लर अशा असंख्य ‘स्कुल मध्ये पारंगत होणार आहे.हे सर्व शिकवताना संस्कृत,मातृभाषा,आश्रमभाषा,राष्ट्रभाषा आणि शेवटी इंग्रजी भाषेला महत्व दिले जाते.
- रोटरी क्लब इंटरनॅशनल च्या माध्यमातून त्यांच्या विविध ठिकाणच्या आजीमाजी भावी गव्हर्नर तसेच विविध पदाधिकारी यांना संपर्क साधला जात आहे. त्यानुसार महाराष्ट्र कर्नाटक गोवा उत्तर प्रदेश दिल्ली सह चारही महानगर अर्थात मुंबई दिल्ली कलकत्ता बेंगलोर इथूनही पदाधिकारी या लोकांचा सहभागी होणार आहेत. शिव जयंतीदिनी शोभायात्रा या लोकोत्सवाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर शहरामध्ये भव्य शोभायात्रा आणि जिल्ह्याची मुख्य नदी असलेल्या पंचगंगा नदी सायंकाळी महारथी असा सोहळा संपन्न होणार आहे .यामध्ये पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळ तसेच शहरातील तालीम संस्था महिला बचत गट आपल्या पारंपारिक वेशभूषेत सहभागी होऊन आपल्या कला सादर करणार आहे .