WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

जागरुक पालक सदृढ बालक’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील बालकांची सोमवारपासून आरोग्य तपासणी- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

प्रत्येक बालकाची तपासणी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा

कोल्हापूर : ‘जागरुक पालक सदृढ बालक’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील बालकांची आरोग्य तपासणी सोमवार दि. 6 फेब्रुवारी पासून हाती घेण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक बालकाची आरोग्य तपासणी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.‘जागरुक पालक सदृढ बालक’ जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. आर. हुबेकर, डॉ. गीता पिल्लाई, डॉ. अमित पाटील यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

रेखावार म्हणाले, या अभियानांतर्गत जिल्ह्यातील शून्य ते अठरा वर्षापर्यंतची सर्व बालके, किशोरवयीन मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करुन घ्या. आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करा. तर गरजू आजारी बालकांवर औषधोपचार करुन शस्त्रक्रिया व प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधाही पुरवा. सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करा, अशा सूचना त्यांनी बैठकीत केल्या. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी बाल आरोग्य तपासणी पथक स्थापन करा.

या अभियानात जिल्ह्यातील बालकांची सविस्तर तपासणी करुन घेण्यात येणार आहे. नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखणे, रक्तक्षय, डोळ्यांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कॅन्सर, अस्थमा, एपिलेप्सी सह अन्य आजारांच्या संशयित रुग्णांना ओळखून त्वरित औषधोपचार करण्यात येणार आहेत. याबरोबरच किशोरवयीन मुला-मुलींमधील शारीरिक व मानसिक आजार शोधून त्यांनाही आवश्यकतेनुसार उपचार करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी दिली.

या अभियानांतर्गत प्रत्येक आजारी बालकांवर वैद्यकीय उपचार, औषधोपचार तसेच नजिकच्या आरोग्य संस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व तपासण्या, शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, बालगृहे, बाल सुधारगृहे, अनाथ आश्रम, समाज कल्याण आणि आदिवासी विभागाची वसतिगृहे, अनाथ आश्रम आदी ठिकाणी बालकांची आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हुबेकर यांनी दिली.

पथक निहाय त्या त्या कार्यक्षेत्रानुसार तपासणी होण्यासाठी काटेकोर नियोजन करा. प्रत्येक तपासणी पथकाकडून एका दिवसात किमान 150 विद्यार्थ्यांची तपासणी होईल, शासकीय, निमशासकीय शाळा, खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अंगणवाडी, अंध, मुक, मतिमंद, अस्थिव्यंग, दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या तपासणीचे पथकाने नियोजन करावे.

परीक्षा पे चर्चा .. काेल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांनी साधला असा संवाद! विद्यार्थ्यांमध्ये वाढली आत्मविश्‍वासाची भावना…

त्याचबरोबर जिल्ह्यातील बालगृहे, बाल सुधारगृहे, अनाथ आश्रम, समाज कल्याण आणि आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांसह ऊस तोड, वीट भट्टी आदी काम करणाऱ्या कामगारांच्या शाळाबाह्य बालकांचीही तपासणी होईल, यासाठी चोख नियोजन करा. पुरेसा औषधसाठा ठेवा. या योजनेची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक पालक व बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी रेखावार यांनी केल्या.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.