मुख्य सूत्रधारासह रॅकेट उघडकीस, राधानगरी पोलिसांचे यश, डिजिटल सोनोग्राफी मशीन केलं हस्तगत
राधानगरी-विजय बकरे
शासन ज्या गाेष्टींना विराेध करते. नेमकं त्याच गाेष्टी आजही समाजात चाेरी छुपे आहेत. याला दाेन्ही बाजू जबाबदार आहेत. आजही मुलगी नकाेशी म्हणून अनेक कुटुंब बेकायदेशीर यंत्रणांचा अवलंब करत आहेत. ज्याला कायदा मान्यता देत नाहीत. नेमकं अशाच घटना समाजातील विविध स्तरावर आजही घडत आहेत.. परंतु, राधानगरी पाेलिसांच्या चाणाक्ष नजरेमुळे आणि माहितीच्या आधारे त्यांनी अखेर मुख्य सूत्रधारासह गर्भलिंग तपासणीचे माेठे रँकेट उघडकीस आणले. या कामी पाेलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी त्यांचे विशेष अभिनंदनन देखिल केले आहे.
राधानगरी तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग चाचणी करणारे रॅकेट तयार झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांच्या सूचनेनुसार राधानगरी पोलिसांना सात आरोपींसह डिजिटल सोनोग्राफी मशीन हस्तगत करून जिल्ह्यात सुरू असणारे गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यास यश आलंय. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता चार फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
राधानगरी पोलिसांसह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष कोल्हापूर यांच्या कारवाईमध्ये श्रीमंत तानाजी पाटील परिते (ता.करवीर) सुनील रामचंद्र ढेरे अमजाई व्हरवडे(ता. राधानगरी) दत्तात्रय कृष्णात पाटील सिरसे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक सोनोग्राफी मशीन हस्तगत केलं होतं. त्यानुसार त्यांच्यावर वैद्यकीय व्यवसाय अधिनियम,महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी कायदा सह वैधकीय गर्भपात आधीनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.
राधानगरी पोलिसांनी अधिक तपास करत असताना गजेंद्र उर्फ सनी बापूसो कुसाळे सिरसे, दयानंद पांडुरंग संकपाळ कसबा वाळवे , डॉक्टर ज्ञानदेव लक्ष्मण दळवी फुलेवाडी कोल्हापूर, डॉ. उमेश लक्ष्मण पवार करंजफेन शाहूवाडी हे आरोपी दोषी आढळल्याने आरोपींना अटक करून त्यांना 14 दिवसीय पोलीस कोठडीत घेतलं होतं. अधिक तपास केला असता काही एजंटानी हिंदुराव उर्फ दिलीप बाळासो पोवार शिरगाव यांच्याकडे त्यांचा भाऊ विजय बाळासो पोवार यांच्यामार्फत गर्भलिंग चाचणीकरिता महिला पाठवल्याचे निष्पन्न झाल्याने, विजय बाळासो पोवार, मुख्य सूत्रधार हिंदुराव उर्फ दिलीप बाळासो पोवार शिरगाव यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राधानगरी यांनी 4 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिलीय. दरम्यान आरोपी विजय बाळासो पवार यांच्याकडून आणखीन एक डिजिटल सोनोग्राफी मशीन जप्त केली असून सदर गुन्ह्याचा सकल तपास सुरू असल्याचं राधानगरी पोलिसांनी सांगितलं आहे.
ही कारवाही पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड, पोलीस निरीक्षक एस एम यादव,पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल के डी लोकरे, बी डी पाटील, सुरेश मेटील, सचिन पारखे, गजानन गुरव ,रोहित खाडे,रणजीत वरोटे, कृष्णात साळुंखे, दिगंबर पाटील यांनी सहभाग घेतला होता.