WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

परस्परांत समन्वय ठेवावा…भाविकांना सर्वाेत्तम सुविधा द्याव्यात!पंचमहाभूत महोत्सव यशस्वी करावा- प्रवीण दराडे

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव दराडे यांच्याकडून सुमंगल पंचमहाभूत महोत्सव होणाऱ्या जागेची पाहणी

कोल्हापूर : श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ संस्थान कडून पर्यावरण संवर्धनासाठी सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव दिनांक 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवात सर्व शासकीय विभागांच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती देणारे प्रदर्शन स्टॉल लावावेत. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी परस्परात योग्य समन्वय ठेवावा व प्रत्येक विभागाला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव तथा पंचमहाभूत महोत्सवाचे नोडल अधिकारी प्रवीण दराडे यांनी दिले.

कणेरी मठ, सुमंगलम पंचमहाभूत महोत्सवाच्या जागेची पाहणी

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सुमंगल पंचमहाभूत महोत्सवाच्या अनुषंगाने कणेरी मठ परिसरात होणाऱ्या या महोत्सवाच्या जागेची पाहणी तिथे प्रत्यक्ष भेट देऊन केली. यावेळी मठाकडून करण्यात येत असलेल्या विविध कामांची पाहणी श्री. दराडे यांनी केली. श्री काडसिद्धेश्वर स्वामी यांनी महोत्सवाच्या सुरु असलेल्या सर्व कामांची माहिती दराडे यांना दिली. यावेळी दराडे यांनी ज्या विभागांची कामे अपूर्ण आहेत ती कामे त्वरित पूर्ण करण्याबाबतचे निर्देश शासकीय यंत्रणेला दिले. त्यानंतर दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी पंचगंगा नदी घाटावर महाआरती होणार असल्याने त्या ठिकाणची पाहणी ही श्री. दराडे यांनी केले. यावेळी सर्व शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव पूर्व तयारी आढावा बैठकीत दराडे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मठाचे प्रतिनिधी संतोष पाटील, उदय सामंत, माणिक चुयेकर यांच्यासह मुंबई येथील पर्यावरण विभागाचे अन्य अधिकारी व जिल्हा प्रशासनाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

प्रधान सचिव  दराडे पुढे म्हणाले की, या पंचमहाभूत महोत्सवासाठी कणेरी मठ परिसर व महोत्सवाच्या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा संबंधित विभागांनी त्वरित उपलब्ध करुन देण्यात याव्यात. त्या भागात ग्रामीण रस्ते, सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ते दुरुस्ती, मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा, भाविकांसाठी पाण्याची सुविधा, स्वच्छता, आरोग्य सुविधा याबाबत सर्व संबंधित विभागांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सुचित केले.

कोल्हापूर महापालिकेने त्यांच्याकडील शहर वाहतूक बसेसची व्यवस्था महोत्सव कालावधीत किमान दहा दिवस दहा बसेस कणेरी मठ ते कोल्हापूर शहर लोकांचे दररोज ने-आण मोफत करण्यासाठी उपलब्ध करुन द्याव्यात. यासाठी आवश्यक असणारा निधी पर्यावरण विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याप्रमाणे परिवहन राज्य महामंडळाने त्यांच्याकडेही अशा पद्धतीने राखीव बसेस ठेवाव्यात व प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे त्या उपलब्ध करुन द्याव्यात, असेही त्यांनी सुचित केले.
या महोत्सवाच्या कालावधीत किमान 20 ते 25 लाख लोक येण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी शासनाच्या किमान 24 विभागाचे विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती देणारे मोठे स्टॉल या ठिकाणी दर्शनी भागात लावावेत. या स्टॉलच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांची माहिती आकर्षक फ्लेक्सद्वारा तसेच ऑडिओ जिंगल्स, व्हिडिओच्या माध्यमातूनही लोकांना देण्याबाबतची कार्यवाही करावी, अशा सूचना दराडे यांनी दिल्या.

महोत्सव कालावधीत मोठ्या संख्येने लोक येणार असल्याने कोल्हापूर शहर तसेच अन्य पर्यटन ठिकाणीही पाणीपुरवठा व स्वच्छतेबाबत अधिक दक्षता संबंधित यंत्रणेने घ्यावी. आरोग्य यंत्रणाही अलर्ट ठेवावी. महोत्सव परिसरात आपत्तीकालीन यंत्रणाही दक्ष ठेवावी. पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, फिरते पथक आदी यंत्रणा अलर्ट ठेवाव्यात, अशा सूचना दराडे यांनी दिल्या.

या सर्वाेत्तम उपक्रमाला नक्कीच नागरिक, भाविकांची साथ मिळालयलाच हवी, एकजुटीतून हा उपक्रम यशस्वी हाेईल- POSITIVVE WATCH

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.