सुमंगलम पंचभूत लोकोत्सवच्या निमित्ताने कणेरी मठावर पर्यावरण जनजागृतीचे अतिशय महत्त्वाचे काम सुरू आहे, याबाबत मठाचे कौतुक करावे तेवढे थोडे असून छत्रपती घराण्याच्या वतीने या महोत्सवाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी दिले.
सिद्धगिरी मठ येथे होणाऱ्या सुमंगलम महोत्सवाची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आहे. मंगळवारी मालोजीराजे यांच्यासह डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, माजी आमदार संजय घाटगे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंजना रेडेकर, माजी नगरसेवक अर्जुन माने, शिवसेनेचे प्रा. सुनील शिंत्रे डॉ. संपतकुमार यांच्यासह अनेकांनी मठाला भेट दिली. पंचभूत महातत्वाच्या सर्व मंडपाची, सेंद्रिय शेती, सोळा संस्कार व भव्य सभा मंडप स्टॉल यांची त्यांनी पाहणी केली. अतिशय वेगाने सुरू असलेल्या तयारीबद्दल समाधान व्यक्त केले. डॉक्टर संदीप पाटील प्राचार्य मधुकर बाचुळकर अशोक वाली उदय गायकवाड राजू लिंग्रज,प्रताप कोंडेकर यांनी त्यांना माहिती दिली
पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामींच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण जागृतीचे काम अतिशय चांगले सुरू आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या पर्यावरण प्रेमी विचारांचा जागर शोभा यात्रेच्या निमित्ताने केला जाणार आहे, हे कौतुकास्पद आहे. जनतेच्या हितासाठी आणि पर्यावरण जागृतीसाठी सिद्धगिरी मठाच्या वतीने जे कार्य सुरू आहे त्यामध्ये सर्व जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे —मालोजीराजे
यावेळी संयुक्त राजारामपुरी मंडळाचे पदाधिकारी काका जाधव, आलोक पाटील, कमलाकर जगदाळे ,संजय काटकर ,दुर्गेश लिंग्रज, नितीन पाटील, अमर निंबाळकर, अनुप पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.