शिरोळ पोलिसांकडून अट्टल चेनस्नॅचर जेरबद
शिरोळ – संदीप इंगळे
सतीश मायाप्पा जावीर रा पुजारीवाडी चिंचोली ता सांगोला जि सोलापूर या अटटल चेनस्नॅचिंग संशयीतास पकडण्यास शिरोळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकास यश आले असून या संशयीत चेनस्नॅचरकडुन शिरोळ, कुरूंदवाड, इचलकरंजी, कोल्हापुर, शाहुवाडी, सांगली परीसरातील एकुण ८ चेनस्नॅचींग चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.यामध्ये संशयीताकडुन एकुण १०५ ग्रॅम (१०. ५) तोळे वजनाचे सोन्याची दागीने व गुन्हयात वापरलेली मोटारसायकल असा ६ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, या गुन्ह्याचा शोध तात्काळ लावल्याबद्दल शिरोळ पोलिसांना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी १५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे अशी माहिती गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे -पाटील यांनी सोमवारी शिरोळ येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस उपाधीक्षक रामेश वैजने, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
शिरोळ पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे -पाटील म्हणाले, शिरोळ पोलीस ठाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी शोभा सुरेश सुर्यवंशी ४५ रा. सुर्यवंशी मळा, चिंचवाड ता. शिरोळ यांनी दिली होती. मंगळवार दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.४५ याचे सुमारास बेघर वसाहत, सुर्यवंशी मळा येथे फिर्यादी व त्यांच्या सासु लक्ष्मीबाई सुर्यवंशी अशा दोघी बोलत थांबल्या होत्या. यावेळी एका अज्ञात मोटारसायकलवरील इसमाने फिर्यादी शोभा सूर्यवंशी यांची सासू लक्ष्मीबाई सूर्यवंशी यांचे गळयातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागीने जबरदस्तीने हिसडा मारुन काढुन घेवुन त्यांना धक्का देवुन खाली पाडून जखमी करुन मोटारसायकलवरुन पळून गेल्याची फिर्याद दिली होती.
गुन्हयाच्या तपासाबाबत तत्कालीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी शिरोळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाकडील अंमलदार यांना योग्य त्या सुचना देवून सखोल तपास करणेबाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे सदर गुन्हयाबाबत फिर्यादी यांचेकडुन संशयीत आरोपी, त्याने गुन्हयात वापरलेली मोटारसायकल यांचे वर्णन प्राप्त करुन घेवुन व्हॉटसअँप /सोशल मिडीया माध्यमातुन पोलीस पाटील, पोलीस मित्र तसेच नमुद फिर्यादी यांचे नातेवाईकास कळवून संशयीत आरोपी हा मिरजेच्या दिशेने निघुन गेला असल्याचा संशय असलेने मिरजेचे दिशेने पोलीस नाईक ताहीर मुल्ला व पोलीस कॉन्स्टेबल युवराज खरात असे तात्काळ रवाना झाले.त्यांनी संशयीत याचे वर्णनाची मिळतीजुळती वाहने चेक करत असताना त्यांना संशयीत आरोपीच्या वर्णनाचा इसम वडडी ता. मिरजकडे गेलेचे माहीती मिळाली. मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे लोकांच्या मदतीने गुन्हा घडल्यापासून दोन तासाच्या आत सदर गुन्हयातील आरोपीस शिताफीने त्याचे मोटारसायकलसह ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने सतीश मायाप्या जावीर ब.व २८ रा. पुजारवाडी, चिंचोली ता. सांगोला जि.सोलापूर असे नाव सांगीतले.सदर संशयित आरोपीकडे कसून चौकशी केली असता, त्याने गुन्हयाची कबुली दिली परंतु चोरीच्या मुददेमालाबाबत विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिलेने त्यास ताब्यात घेवून गुन्हयाचे तपासकामी अटक केली. त्यास जयसिंगपूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता न्यायालयाने संशयीतास ५ दिवस पोलीस कोठडी सुनावली.
- पोलीस कोठडी मुदतीत गुन्हयाबाबत ८० पेक्षा अधीक सीसीटीव्ही फुटेजचे सुमारे २०० तासांचे रेकडिींग तपासुन सदर आरोपीस अधीक विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता त्याने मागील १ वर्षापासून शिरोळ, कुरूंदवाड, इचलकरंजी, कोल्हापुर, शाहूवाडी, सांगली परीसरात अश्या प्रकारचे गुन्हे केलेचे कबुली दिली. त्याच्याकडून गुन्हयातील चोरी केलेले एकूण १०५ ग्रॅम [१०.५ तोळे वजनाचे सोन्याची दागीने व गुन्हयात वापरलेली हिरो कंपनीची स्पेन्डर मोटारसायकल असा एकुण ६ लाख ४० हजार रुपयेचा मुद्देमाल वडडी ता. मिरज जि.सांगली व चिंचोली ता. सांगोला जि. सोलापूर येथून जप्त करणेत आलेला आहे
- संशयित आरोपी सतीश मायाप्पा जावीर यांचेकडून शिरोळ पोलीस ठाणे कुरुंदवाड पोलीस ठाणे शिवाजीनगर पोलीस ठाणे करवीर पोलीस ठाणे शाहुवाडी पोलीस ठाणे . विश्रामबाग पोलीस ठाणे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेले चेनस्नॅचींग गुन्हे उघडकीस आणण्यात शिरोळ पोलिसांना यश आले.
- सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, पोलीस उपाधीक्षक रामेश्वर वैजने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडडे राजेंद्र मस्के, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे, विश्वास कुरणे पोलीस अंमलदार ज्ञानदेव सानप, ताहीर मुल्ला, गजानन कोष्टी, युवराज खरात, राजेंद्र इटाजपुजारी, मनोज मडीवाळ, रहीमान शेख, संजय राठोड या पथकाने केली आहे.
पाेलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीला POSITIVVE WATCH टीमचा सलाम, काैतुक,, अशा प्रत्येक कार्यकर्तृत्वाला प्रसिद्धी देण्यासाठी POSITIVVE WATCH ची बांधिलकी कायम राहील