WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

जाधव गुरूजींच्या निरूपणाने तुकाराम गाथेच्या अभ्यासाची परंपरा समृध्द – सदानंद मोरे

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विनायक जितकर

मारूतीराव जाधव (तळाशीकर) गुरूजींच्या गाथेचे प्रकाशन होणे ही गोष्ट फार मोठी आणि महत्वाची…

कोल्हापूर – जाधव गुरूजींच्या निरूपणाने तुकाराम गाथेच्या अभ्यासाची परंपरा समृध्द केल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्यावतीने आयोजित 2024 साठीचा पहिला पद्मश्री डॉ. डी. वाय.पाटील पुरस्कार आणि सद्गुरू डॉ.गुरूनाथ मुंगळे आध्यात्मिक तत्वज्ञान साहित्य पुरस्कार वितरण सोहळा विद्यापीठाच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहामध्ये सकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के उपस्थित होते. प्र – कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील पुरस्कार स्व.तळाशीकर गुरूजी यांच्यावतीने आनंदी मारूतीराव जाधव यांनी स्विकारला. तर, सद्गुरु डॉ. गुरूनाथ मुंगळे आध्यात्मिक तत्वज्ञान साहित्य पुरस्कार आय. आय. टी. कानपूर उत्तर प्रदेश येथील प्रा.समीर चव्हाण यांना ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

डॉ. मोरे पुढे म्हणाले, मारूतीराव जाधव (तळाशीकर) गुरूजींच्या गाथेचे प्रकाशन होणे ही फार मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. या गाथेचे प्रचार आणि प्रसार हळूहळू संपूर्ण राज्यभर होणार आहे, ही सुखावणारी गोष्ट आहे. महाराष्ट्राबाहेर उत्तर प्रदेशातील कानपूरमधील आय.आय.टी.सारख्या आधुनिक वैज्ञानिक संस्थेमध्ये कार्य करीत असताना तुकोबांच्या अभंगाचा सखोल विचार करून डॉ.समीर चव्हाण यांनी खंड प्रकाशित करून पुरस्कार प्राप्त केलेला आहे. संत नामदेव, संत तुकोबा, संत एकनाथ महाराज यांनी संत परंपरा कायम ठेवली. महाराष्ट्र राज्यामध्ये वैचारीक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, अध्यात्मीक जडण-घडणीमध्ये सांप्रदायिक समाजाचा विस्तार करण्यामध्ये संत ज्ञानोबांचा – तुकोबांचा मोठा वाटा आहे. श्रीकृष्णाने आपल्या आयुष्यामध्ये अर्जुनाला जसे गीतचे सार सांगितले तसेच सार उध्दवाला भगवत गीतेमधील अकराव्या खंडात सांगितले. अर्जुनाला सांगितलेले उपदेश आपल्यासमोर आले. परंतु, उध्दवाला सांगितलेले उपदेश जगा समोर आणण्याचे मोठे कार्य एकनाथ महाराज यांनी केले. अशा पध्दतीने ज्ञानोबा आणि तुकोबांचा महासमन्वय या ठिकाणी झालेला आहे. विज्ञान, कला, भाषा साहित्य अशा सर्व प्रकारच्या लोकांना तुकोबा महाराज आकृष्ट करू शकतात. एवढे सामर्थ्य त्यांच्या गाथेमध्ये आहे. संत परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्याला देशामध्ये अग्रेसर करावयाचे असेल तर सर्व संतांना एकत्र ठेवणे आवश्यक आहे. सर्व संतांनी आपणांस फार मोठी दिशा दाखविलेली आहे. आजही संत साहित्य अभ्यासणे आणि त्याचा योग्य तो अर्थ लावणे आवश्यक आहे. तुकाराम महाराज हयात असतानाच त्यांच्या अभंगाचा महाराष्ट्रावर फार मोठा प्रभाव पडला होता. पुढे बहिणाबाईंनी वारसा सुरू केला. गेली साडेतीन ते चारशे वर्षे तुकोबांच्या अभंगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न चालू आहे. अभंग गद्य स्वरूपात असते त्याचे पद्य स्वरूपात रूपांतर केले जाते. सर्व प्रथम ब्रिटशांनी तुकोबांच्या अभंगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, प्रार्थना समाजाच्या लोकांनी आठराशे अभंगाचा अर्थ लावलेला खंड प्रकाशित केला. त्या परंपरेमध्ये समाविष्ट होणारे तळाशीकर गुरूजी आणि सद्गुरू डॉ. मुंगळे यांच्या कार्याची दखल शिवाजी विद्यापीठाने घेतली हे अधिक कौतुकास्पद आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षीय मनोगतामध्ये म्हणाले, संत साहित्यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल स्व.तळाशीकर गुरूजी यांना पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर, सद्गुरू डॉ. मुंगळे हे पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांचे अध्यात्मिक गुरू असा हा गुरू-शिष्यांच्या नावाचा पुरस्कार दिला जात आहे, हा दुग्धशर्करा योग आहे. गुरूजींनी गेल्या तीस वर्षांमध्ये सेवानिवृत्ती नंतरच्या कालखंडामध्ये समाजाला तुकोबा महाराज समजावे म्हणून अभ्यास केला आणि तो अभ्यास विद्यापीठाने प्रसिध्द केला. तळाशीकर गुरूजी आणि डॉ.गुरूनाथ मुंगळे पुरस्कार प्राप्त डॉ.चव्हाण या दोघांचा केंद्रबिंदू एकच आहे ते म्हणजे संत तुकाराम महाराज. या दोघांनीही तुकाराम महाराज समजावून सांगण्यामध्ये भर घालण्याचे काम केले आहे.

यावेळी गौरी कहाते (सोलापूर), डॉ.अरूण जाधव (तळाशी), डॉ.समीर चव्हाण (कानपूर) आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.अरूण जाधव आणि आनंदी मारूतीराव जाधव, तळाशीकर गुरूजींच्या आठवणीने भाऊक झाले होते. संपूर्ण सभागृह उपस्थितांमुळे भरले होते. संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख डॉ.नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले तर मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.रणधीर शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी आभार मानले. यावेळी माजी खासदार प्रा. संजय मंडलीक, प्रा, अर्जुन आबिटकर डॉ. प्रतापराव माने, अरूण डोंगळे यांचेसह अधिकार मंडळाचे सदस्य, तळाशीकर गुरूजी यांचेवर प्रेम करणारे तळाशीकरवासीय, पंचक्रोशीतील मान्यवर मोठया प्रमाणात सभागृहात उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.