WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील फार्मसीमध्ये एआय इनोव्हेशन राष्ट्रीय स्पर्धा…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर आर एन जाधव. आमवेत डॉ. आर. के. शर्मा, डॉ. राकेश सोमाणी, डॉ. श्रीनिवास बुमरेला, डॉ. शिंपा शर्मा, डॉ. चंद्रप्रभू जंगमे आदी

कोल्हापूर – डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयक्यूएसी विभाग आणि कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांच्या सहकार्याने “आरोग्यसेवा आणि वैज्ञानिक संप्रेषणातील एआय इनोव्हेशनचे ब्रिजिंग” या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा संपन्न झाली. कर्नाटक, गोवा, छत्तीसगडसह महाराष्ट्रातील १७५ हून अधिक सहभागीनी एआय-चालित आरोग्यसेवा उपाय आणि वैज्ञानिक संप्रेषणाच्या क्षेत्रात त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि संशोधनाचे प्रदर्शन केले.

या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून रिपकोर्ड फार्मास्युटिकल कंपनीचे व्यवस्थापन संचालक श्री. भाविन मधू तर प्रमुख पाहुणे म्हणून असोसिएशन ऑफ फार्मसी टीचर्स ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. राकेश सोमाणी व लातूर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला उपस्थित होते. यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, आयक्यूएसी संचालक डॉ. शिंपा शर्मा, कृष्ण इन्स्टिट्यूटचे अधिष्ठाता डॉ. एन. आर.जाधव, कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, नर्सिंग कॉलेज प्राचार्य डॉ. उमाराणी जे. आदी उपस्थित होते.

कर्नाटक, गोवा, छत्तीसगडसह महाराष्ट्रातील १७५ हून अधिक सहभागीनी एआय-चालित आरोग्यसेवा उपाय आणि वैज्ञानिक संप्रेषणाच्या क्षेत्रात त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि संशोधनाचे प्रदर्शन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्यसेवा आणि वैज्ञानिक संप्रेषण याबाबतच्या कल्पना मांडून शैक्षणिक, उद्योग आणि संशोधन संस्थांमध्ये सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्याच्या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भाविन मधू म्हणाले, भारतीय औषध निर्माण क्षेत्र अर्थात फार्मसी जगात अव्वल स्थानी असून या क्षेत्रात करिअरच्या अमर्याद संधी उपलब्ध आहे.

डॉ. राकेश सोमाणी म्हणाले,पृथ्वीवर शेवटचा मनुष्य जिवंत असेपर्यत फार्मसी क्षेत्राची गरज भासणार आहे. डॉ. श्रीनिवास बुमरेला म्हणाले विद्यार्थ्यांना यशाची उत्तुंग शिखरे गाठायची असल्यास कठोर परिश्रमाला पर्याय नाही. डॉ. आर. के. शर्मा म्हणाले, फार्मसीच्या विद्यार्थ्याना मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या ज्ञानाचा व अनुभवाचा चांगला फायदा मिळेल. डॉ. एन. आर.जाधव म्हणाले आरोग्य यंत्रणेत फार्मासीस्टची भूमिका महत्वाची आहे. कोविड काळात भारतीय फार्मसी क्षेत्राला जगाला मोठा आधार दिला. जगात सर्वाधिक औषध निर्माण करणाऱ्या देशात भारतला महत्वाचे स्थान आहे.

फार्मसी क्षेत्रातील तज्ञ – डॉ. शशिकांत भंडारी, डॉ. सतीश पोलशेट्टीवर, डॉ. रवींद्र जरग, डॉ. फिरोज तांबोळी, डॉ. अभिजीत कुलकर्णी, डॉ.दीनानाथ गायकवाड, डॉ.सोमनाथ भिंगे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे -पोस्टर प्रेझेन्टेशन (पीजी): प्रथम- श्वेता पारीख (भारती विद्यापीठ, कोल्हापूर), द्वितीय-गौरव खैरे व अभिजित दास(एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे), तृतीय-ज्ञानेश्वर माने, संभाजी जाधव, प्रसाद कोळी (भारती विद्यापीठ, कोल्हापूर), पोस्टर प्रेझेन्टेशन (युजी): उदयनराज भोसले (फार्मसी कॉलेज मालवाडी), द्वितीय- सायमा पटवेगार, सिमरन पटवेगार(डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी), उत्तेजनार्थ- करण भेडसे, अविनाश शिंदे, रुपाली रौला (अशोकराव माने इंस्टीट्युट ऑफ फार्मसी, सावे), ओरल प्रेझेन्टेशन संयुक्त विजेते प्रेरणा परदेसी आणि मधुरा शिंदे, द्वितीय -प्रेरणा भोसले (सर्व एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे), उत्तेजनार्थ—सोमेश चव्हाण (डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी) सूत्रसंचालन प्रा.सोनाली दिवटे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अभिनंदन पाटील यांनी केले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.