संगमेश्वर प्रतिनिधी-सत्यवान विचारे-
स्थानिक गुन्हे शाखा व संगमेश्वर पोलिसांच्या संयुक्त कारवाईने केला उघड खुनाचा गुन्हा
रत्नागिरी : मासे विक्री करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेच्या खूनाचा प्रकार काही दिवसांपूर्वी संगमेश्वर येथील जंगलमय भागात घडला होता. या खूनाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व संगमेश्वर पोलिसांनी संयुक्त रित्या करत उघडकीस आणला आहे. याप्रकरणी तरुणास ताब्यात घेण्यात आले आहे.
पाच दिवसापूव्री ( १५ फेब्रुवारी) राेजी सकाळी सात ते दुपारी तीनच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील तारवाशेत पिरंदवणे, येथील जंगलमय पायवाटेवरून विविध वाड्या व गावांमध्ये किरकोळ मासे विक्री करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेला बेदम मारहाण करून, तिला गंभीर जखमी करून मारण्यात आले हाेते. यात तिचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह दूरवर जंगलात नेऊन टाकला हाेता. सईदा रिझवान सय्यद, असे (रा. हनुमान नगर, मधली वाडी, संगमेश्वर) मृत महिलेचे नाव आहे.
तिला एका अज्ञात इसमाने मारहाण व तिच्या डोक्याला गंभीर इजा करून तिला जीवे ठार मारून तिचे प्रेत जंगलामध्ये काही अंतरावर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने नेऊन टाकले होते. त्यामुळे हा तपास करणे पाेलिसांच्या पुढे एक आवाहन बनले हाेते. निर्जन रस्त्यावर जिथे काहीच पुरावा नाही, साक्षिदार नाही, अशा ठिकाणी हा मृतदेहा कुणाचा आणि कुणी मारले हे शाेधणे संगमेश्वर पाेलिसांपुढे प्रश्नन हाेता. परंतु. स्थानिक गुन्हे शाखा आणि संगमेश्वर पाेलिसांनी आपली व्यूहरचना आखत तपासाची चक्रे वेगाने फिरवीली. अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती जयश्री गायकवाड तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक झावरे यांनी काैशल्यपूर्ण तपास करत
मासे विक्री करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलेचा खून होताच संगमेश्वर व परिसरामध्ये तसेच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत होती. या संपूर्ण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या गुन्ह्याची उकल करण्याकरिता, संगमेश्वर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांचे संयुक्त पथक तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पाेलिसांनी अचूक व्युहरचना आखत संपूर्ण परिसर पिंजून काढला. अनेकांना भेटून माहिती घेतली व अखेर खरा गुन्हेगार टप्प्यात आणून ठेवला व तपासाची गती पुन्हा वाढवत अखेर खरा आराेपी पकडला. यशस्वी तपासाच्या कामगिरीनंतर पाेलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी संगमेश्वर पाेलीस अधिकारी , कर्मचारी पथकाला तीस हजार रुपयांचे बक्षिस देण्याचे जाहीर केले.
अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती जयश्री गायकवाड तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पाेलीस ठाण्याचे कार्यतत्पर असलेले कर्तव्यदक्ष पाेलीस निरीक्षक उदय झावरे, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, स्था.गु.शा. रत्नागिरी व संयुक्त पथकाने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू करताना सर्व त्या शक्यता पडताळून पाहिल्या.. याेग्य दिशेन तपास करत एकएक धागेधाेरे गाेळा करत खरा गुन्हेगार, खरा खुनी काेण आहे. याचा तपास सुरु करताना सर्व ते बारकावे तपासले व एका निष्कर्षापर्यंत हे संयुक्त पथक येऊन पाेेहाेचले. त्यानंतर वरिष्ठांशी संवाद साधून पुढील व्यूहवरचना आखून अखेर संगमेश्वर पाेलीस ठाण्याचे उदय झावरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा आपली शिकार अखेर अलगद जाळ्यात पकडले. दरम्यान ज्याचावर संशय हाेता, त्याची सविस्तर माहीत घेत, त्याला पकडण्यासाठी साफळा रचून पाेलीस पथकाने त्याच्या अखेर मुसक्या आवळल्याच.
संगमेश्वर पाेलीस व स्थानिक गुन्हे अन्वेशनच्या अधिकारी, कर्मचारी वर्ग व पथकाने अतिशय चांगली मेहनत घेऊन, तपास पूर्ण केला. कमी वेळात या गुन्ह्याचा याेग्य छडा लावला आहे. पुढील तपास सुरु असून. हे सर्व पाेलीस निश्चितच काैतुकास पात्र आहेत, अशी प्रतिक्रीया तपासानंतर पाेलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिलीय .
रॅम्बो नि पाेलीस एकत्र आले नि शाेधला चाेर.. पहा काेण हा रँम्बाे
अवघ्या पाच दिवसात पाेलीसांनी ही यशस्वी कामगिरी करताना गाेपनिय माहितीच्या आधारे पिरंदवणे बौद्धवाडी येथे राहणाऱ्या एका 23 वर्षीय युवकास, ताब्यात घेतले. जयेश रमेश गमरे यास ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. तपास करताना व संशयिताकडून माहिती घेताना सुरुवातीला जयेश गमरे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पाेलिसांचा खाक्या दाखविताच जयेश गमरे याने अखेर ताेंड उघडत गुन्हाची माहिती दिली. माहितीच्या आधारे पाेलिसांनी पुढील तपास सुरु केला असून. जयेश गमरे याला न्यायालयात हजर केले असता, दि. २४ तारखेपर्यंत पाेलीस काेठडी सुनावण्यात आलेली आहे. संशयित आरोपी जयेश रमेश गमरे याने, किरकोळ मासे व्यावसायिक श्रीमती. सईदा रिझवान सय्यद, रा. हनुमान नगर, मधली वाडी, संगमेश्वर हिची दगडाने ठेचून हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबाबत प्राथमिक माहिती पाेलिसांना प्राप्त झाली आहे. याच माहितीच्या आधारे त्याला 24/02/2023 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. ही कारवाई, हेमंतकुमार शहा, पोलीस निरीक्षक, स्था. गु.शा, रत्नागिटी व पोलीस अंमलदार तसेच उदय झावरे पोलीस निरीक्षक संगमेश्वर पोलीस ठाणे व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.
धक्कादायक.. इथं व्हायची गर्भलिंग चाचणी! आणि… मुख्य सूत्रधार निघाला
पाेलिसांनी जलदगतीने केलेला तपास व उघडकीस आणलेला गुन्हा यामुळे संगमेश्वर पाेलिसांचे वरिष्ठांनी काैतुक केले असून, संगमेश्वर तालुक्यातून देखिल पाेलिसांच्या या विशेष कामगिरीचे तसेच तपासाचे अभिनंदन केले जात आहे. आता पुढील तपासाकडे लक्ष लागून राहिले असून, नेमका गुन्हा का व कशासाठी घडला याची उत्सुकता लागून राहिलेली आहे.
पाेलिसांच्या या कार्यकर्तृत्वास नि शाेध माेहिमेस.. POSITIVVE WATCH चा सलाम..