गलथान कारभाराकडे दुर्लक्ष कुणाचे
राधानगरी- विजय बकरे
काेकणला आणि काेल्हापुरला जाेडणारे राधानगरी हे महत्वाचे बसस्थानक आहे. या आगारातून ये- जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही अधिकतेर आहे. मात्र या प्रवाशांना वेळेत एस. टी. बस मिळत नसल्याची माेठी समस्या आहे. याविषयी अनेकदा तक्रारी करूनही येथील एस. टी. प्रशासन दखल घेत नसल्याने प्रवाशी वर्गात तीव्र नाराजी व संताप व्यक्त हाेत आहे. त्यामुळे येथील आगार प्रमुख तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन राधानगरी बस स्थानकातील एस. टी. बसेस व कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे द्यावेत अशी मागणी हाेत आहे. राधानगरी एसटी आगाराची राधानगरी ते फोंडा एसटी कधीच वेळ सुटत नाही .ती एसटी वेळेवर सोडावी अशी मागणी विद्यार्थी व शिक्षकांच्या मधून सातत्याने हाेत आहे. असाच अनुभव अन्य काही एस. टी बसचा देखील येत आहे.
राधानगरीतील जनावरांच्या बाजाराला शेतकरी व व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
राधानगरी एसटी आगाराची राधानगरी ते फोंडा ही एसटी सकाळी नऊ वाजता राधानगरी बस स्थानक सुटते. मात्र, येथील ढिसाळ कारभारामुळे ती एसटी कधीच वेळेवर सुटत नाही तसेच अनेकदा काेणत्याही कारणामुळे रद्द केली जाते. पश्चिम भागामध्ये जाणारी एकच एसटी बस असल्याने त्या भागातील विद्यार्थी व प्रवासी मोठ्या प्रमाणात असतात व सध्या त्या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा चालू असल्याने त्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेत जाण्यास गाडी नसल्याने त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे माेठे नुकसान हाेत आहे. आता परिक्षेचा हंगाम सुरु आहे. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून येत जात असतात. त्यामुळेल परिक्षेच्या काळात तरी एस. टी. प्रशासनाने सर्तक राहून एस. टी. बसची सेवा सुरुळीत ठेवावी अशी माफक अपेक्षा प्रवाशी नागरिक व विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.