WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

वक्तृत्व स्पर्धेमधून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जनमानसात प्रभावीपणे रुजतील – विशाल लोंढे

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

कोल्हापूर:  स्वराज्याची संकल्पना शिवरायांनीच प्रथम मांडली. लोकशाही पद्धतीने राज्यकारभार करणारा राजा अशी त्यांची जगात ओळख आहे.  इतर धर्मियांचा आदर बाळगणे, स्त्रियांचा सन्मान करणे आणि गरिबांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे हे शिवरायांच्या राज्यकारभाराचे वैशिष्ट्य होते. म्हणूनच आजच्या लोकशाहीत देखील त्यांच्यासारखा एका लोककल्याणकारी राजाची आठवण केली जाते. त्यांच्या सैन्यात अनेक जाती-धर्माचे आणि जीवाला जीव देणारी माणसं होती त्यांनी कधीही जातीवादाला थारा दिला नाही उलट अठरापगड जातीतल्या लोकांना सोबत घेऊनच शिवाजीराजांनी आपले स्वराज्याची स्वप्न पूर्ण केले, असे विचार समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आयोजित अभिवादनाच्या कार्यक्रमात केले.

या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन राज्यगीत “जय जय महाराष्ट्र माझा” या गीताचे सामुहिक गायन करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वसतिगृह, निवासी शाळा व आश्रम शाळा मधील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व जीवन प्रसंगावर आधारित वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

  • वक्तृत्व स्पर्धेमध्ये एकूण 46 विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. गारगोटी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहातील चैतन्य कुंडलिक  कांबळे याचा प्रथम, कसबा बावडा, मराठा कॉलनी येथील मुलींचे शासकीय वसतिगृहातील कु.प्रज्ञा पांडुरंग कांबळे हिचा द्वितीय व तेरवाड येथील प्राथमिक आश्रमशाळेतील तनाज आशपाक बेपारी तृतीय क्रमांक आला. विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.

               कार्यक्रमासाठी दिनकरराव शिंदे स्कूल ऑफ सोशल वर्क मधील प्राध्यापक डॉ. उमेश वळवी,  डॉ. कालिंदी रानभरे यांनी परीक्षक म्हणून कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन परब यांनी केले. प्रास्ताविक दत्तात्रय पाटील यांनी केले तर आभार सचिन पाटील यांनी मांडले.कार्यक्रमांमध्ये शासकीय निवासी शाळा, वसतिगृहे व  विजाभज  प्रवर्गातील आश्रम शाळेतील विद्यार्थी-विदयार्थ्यींनी, गृहपाल, शिक्षक व इतर कर्मचारी तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील अरविंद रंगापुरे, सचिन पाटील, प्रताप कांबळे, सुप्रिया काळे व कल्पना पाटील तसेच इतर अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी