सुमंगलं पंचमहाभूत लोकोत्सवात महावितरणचाही पुढाकार
कोल्हापूर : कोल्हापूर स्थित श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ येथे पर्यावरणाच्या पंचतत्वांचे जतन, संरक्षण व संवर्धनासाठी सुमंगलं पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायु,आकाश या पाच तत्वांपैकी तेज अर्थात ऊर्जा तत्वाबद्दल महावितरणकडून प्रदर्शनी साकारण्यात आली आहे. पर्यावरणपुरक, स्वच्छ व शाश्वत ऊर्जेचा स्त्रोत असलेल्या सौरऊर्जा वापरास प्रोत्साहन मिळावे, या हेतूने ‘सौर जागर’ करण्यात येतो आहे. वीजग्राहक, नागरिक व विद्यार्थी यांचा प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.
महावितरणच्या कामाचे कौतुक
सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवासाठी सुरळीत वीजपुरवठा व्हावा, याकरिता महावितरणकडून जलद गतीने विद्युत सुविधांची उभारणी करण्यात आली. याबद्दल मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे, पालकमंत्री मा.ना.श्री.दीपक केसरकर यांनी महावितरणच्या कामाचे कौतुक केले आहे.
महावितरणचा माेठा निर्णयः जुने घर खरेदी करा आणि नवीन मालक व्हा!
सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातील महावितरणच्या प्रदर्शनीतून घरगुती ग्राहकांसाठी 40 टक्के अनुदान असलेली केंद्रसरकारची सौरछत योजना, शेतीला दिवसा वीज मिळावी, यासाठी राबविण्यात येत असलेली मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना या योजनांचा प्रामुख्याने प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. त्यासोबतच बचत हीच निर्मिती या सुत्रानुसार वीजेचा कार्यक्षम वापर व वीजबचत, महावितरणच्या ऑनलाइन ग्राहकसेवा, गो ग्रीन ही पर्यावरणपूरक सेवा, सुरक्षित वीजवापर, ग्राहकांनी नियमित वीज बिल भरावे, वीजचोरी रोखणे या विषयासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. देशाची ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीबाबत चित्रफीत प्रसारित करण्यात येत आहे. दि.20 फेब्रुवारी पासून सुरू झालेला हा लोकोत्सव 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत सुरू असणार आहे.
कर्मचाऱी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घ्या…२७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा