काेल्हापूरः शिवजयंतीचा उत्साह शिवजयंतीनिमित्त सर्वत्रच पहायला मिळाला.. अगदी सगळीकडेच ढाेल ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांजी जयंती साजरी केली जात हाेती. पारंपारीक वेशभुषा.. जल्लाेष, रँली असे वातावरण असताना मात्र काेल्हापूर शहरातील शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक भान जोपासली. ” उमेद फौंडेशन ” या संस्थेत शिवजयंती साजरी करताना गरजूंना किराणा बाजार , धान्य , दैनंदिन वस्तू व शैक्षणिक साहित्य असे साहित्य वाटण्याचा उपक्रम हाती घेऊन ताे यशस्वी पार पाडण्यात आला.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने कोल्हापुर जवळील कोपार्डे फाटा येथील ऊसतोड कामगार , वीटभट्टी मजूर , कचरा वेचक लोक , एकल पालक यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या व त्यांचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या तसेच त्यांचे संगोपन व पालन पोषण करणाऱ्या ” उमेद फौंडेशन ” या संस्थेमध्ये सामाजिक भान जोपासत शिवजयंती साजरी करण्यात आली. या संस्थेस शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने मुलांच्या शिक्षणासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य , किराणा बाजाराचे साहित्य , कडधान्ये , तेल डबा , दैनंदिन वापरातील अनेक वस्तू असे जवळपास ३० ते ३५ हजार रुपयांचे साहित्य यावेळी देण्यात आले.
नव्या वर्षाची अशी सुरुवातः शिवशक्ती प्रतिष्ठानने राबविलेल्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा!
सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन संस्थेच्या व्यवस्थापकांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उमेद फौंडेशन या संस्थेच्या कामकाजाविषयी जाणून घेण्यात आले तसेच शिवशक्ती प्रतिष्ठानच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रतिष्ठानच्या वतीने आणलेले सर्व साहित्य व वस्तू त्यांना सुपूर्द करण्यात आल्या. उमेद फौंडेशनचे विद्यार्थी व उपस्थित सर्वांना प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके देखील सादर करून दाखवली. अशा तर्हेने प्रतिवर्षीप्रमाणे यंदा देखील शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक भान जोपासत हा शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवशक्ती प्रतिष्ठान यांचे नेहमीच उपक्रम वेगळे आणि समाजहिताचे तसेच धार्मिक तथा युगपुरूष, थाेर पुरुष यांच्या कार्याच्या जनजागृती विषयीचे असतात. दरवर्षी पुतळ्यांची स्वच्छता, पुजा करण्याचे कार्य देखील शिवशक्ती प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात येते. त्यामुळे नेहमीच शिवशक्ती प्रतिष्ठान आणि यातील कार्यकर्ते हे काैतुकास पात्र ठरत आहेत.स्वखर्चातून आणि समाजहितासाठी तसेच युगपुरूषांच्या कार्याची गाथा सांगण्यासाठी हे युवक नेहमीच पुढे असतात.
यावेळी उमेद फौंडेशनचे व्यवस्थापक प्रकाश गताडे , प्रकाश म्हेतर , प्रदीप नाळे , विजय पाटील व सर्व विद्यार्थी तसेच शिवशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष साताप्पा कडव , उपाध्यक्ष योगेश रोकडे , अमोल पोवार , निलेश खोले , संदीप पाडळकर, प्रशांत जाधव , निलेश पिसाळ , श्रीधर बावडेकर , सागर साळोखे , प्रशांत पाटील , गणेश मांडवकर , कैलाश दुधनकर , प्रफुल्ल भालेकर , प्रवीण कुरणे , बजरंग गावडे , रणजीत चौगले, तुकाराम खराडे , रोहित पाटील , श्रेयस कुरणे , मनीष बडदारे, अरुण सावंत , निलेश पोवार, सुधीर जितकर , नितीन वंदूरे – पाटील , दयानंद पाटील , सचिन सणगर, सुजित जाधव , स्वप्नील पाटील , एकनाथ कदम , रुपेश जाधव , चेतन गायकवाड, सौरभ कापडी, विनायक चौगले , प्रशांत गारे , हेमंत काळे , तनवीर बावडेकर , आदी उपस्थित होते.
अघिक वाचला गेलेला संपादीकय लेखः दयनीय,हतबल हताश ‘मातोश्री ‘