शिवशक्ती प्रतिष्ठान परिवार कोल्हापूरचे आवाहन
रविवार दि. १ जानेवारी २०२३ रोजी इंग्रजी नवीन वर्षाची सुरवात आपण छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून करणार आहोत. गेली ७ वर्षांपासून आपण हा उपक्रम राबवत असून उदया देखील राबवणार आहोत.
उद्या दि १ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ठीक ७ वाजता ( त्या आधीच १० मिनिटे सर्वांनी उपस्थित राहावे ) छत्रपती संभाजी महाराज स्मारक , रुईकर कॉलनी , कोल्हापूर येथे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे.
स्मारक परिसरात टँकर च्या पाण्याद्वारे स्वच्छता करून व नवीन भगवा ध्वज फडकाऊन झाल्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व अभिवादन करून हा उपक्रम पूर्ण करणार आहोत. तरी सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवशक्ती प्रतिष्ठान परिवार कोल्हापूर यांच्यातर्फे केले आहे.
या उपक्रमास POSITIVVE WATCH चा सलाम… नक्कीच या उपक्रमाचा सर्वांनी आदर्श घ्यावा