फातरफेकर कुटुंबियांच्या मदतीतून संगणक लॅब अद्ययावत
कोवाड – येथील सर्वोदय शिक्षण संस्था संचलित,कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील् सायन्स विभागातील संगणक प्रयोगशाळेसाठी प्रोफेसर गीता फातरफेकर सेठ, जी, एम.मेडिकल आणि के.ई. एम हॉस्पिटल मुंबई.आणि विजय फातरफेकर् (एम.डी.) ड्रेसर रयन्ड अँड सिमेन्स कंपनी.मुंबई या दाम्पत्यांनी येथील संगणक लॅबसाठी उदार अन्त्तकरणांनी देणगी दिल्यामुळे अध्ययावत अशीलॅब तयार झाली आहे.
एकाच वेळी चाळीस विध्यार्थाची प्रात्यक्षिकासाठीची प्रशस्त बैठक व्यवस्था फर्निचरचा वापर करून सुंदर पद्धतीनी लॅब तयार केली आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करताना अडचण होऊ नये प्रात्यक्षिक सुकर व्हावे म्हणून देणगीच्या माध्यमातून समस्या दूर केली आहे, त्यासाठी फातर्फेकर या कुटूंबियांचे देणगीच्या रूपातून खूप मोठे योगदान लाभले आहे.
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल राज्यात पहिले तर भारतात तिसरे
देणगीसाठी प्राचार्यां डॉ. एम.एस.पवार यांचे सहकार्य मिळाले या देणगीतून चाळीस नवीन संगणक तसेच त्याला लागणारे फर्निचर ,प्रोजेक्टर, पॉवर बॅकअप लाईट अशा सर्व बाबींसह लॅब सुस्सज्य आणि अद्ययावत करण्यात आली आहे. या लॅबचे उदघाटन संस्था अध्यक्ष डॉ.ए.एस.जांभळे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.
PLZ SEE VIDEO LINK —https://youtu.be/0KxTGsNADh0
महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी रुजू होऊन फक्त तीन महिने होता च प्राचार्य डॉ.एम.एस.पवार यांनी देणगीच्या मदतीतून संगणक प्रयोगशाळा नव्या रूपात विध्यार्थ्यांना खुली करून विदयार्थांची गैरसोय दूर केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष.डॉ.ए. एस.जांभळे सचिव एम.व्ही.पाटील यांनी देणगीदारांचे आणि प्राचार्यांचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी संस्था संचालक एम.जे.पाटील,मा.ए.डी.मुल्ला,गुंडू सावन्त,प्रा.व्ही.आर.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांचे स्वागत प्राचार्य डॉ.एम.एस.पवार यांनी केले.आभार प्रा.एस.जे.पाटील,सूत्रसंचालन डॉ.मोहन घोळसे यांनी केले. यावेळी कला,वाणिज्य,आणि विज्ञान शाखेतील सर्व विभागांचे प्रमुख,प्राद्यापक, सर्व प्रसासकीय सेवक,कर्मचारी,विध्यार्थी उपस्थित होते.
प्रत्येक सत्कार्यासाेबत पाँझिटीव्ह वाँच आपल्या साेबत… सलाम या कार्यकर्तृत्वाला- पाँझिटीव्ह वाँचटीम