कोल्हापूर : लव जिहाद चा कोल्हापुरातील कोणताही मुस्लिम बांधव समर्थन करणार नाही. लव जिहाद, जबरद्स्तीचे धर्मांतरण या गोष्टी इस्लामात सुद्धा अस्तित्वात नाहीत. ही विषवल्ली ठेचून काढलीच पाहिजे. प्रत्येक जाती धर्माच्या महिलांचे मानसन्मान व संरक्षण झालेच पाहिजे, पण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापुरात हिंदू- मुस्लिम समाजातील एकोपा आणि सामाजिक सलोखा संपूर्ण देशात चर्चेचा विषय आहे, असे स्पष्टीकरण मुस्लिम समाजाचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांनी केले आहे.
१ जानेवारी रोजी कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या लव जिहाद विरोधी जन आक्रोश मोर्चाला कोल्हापुरातील समस्त मुस्लिम समाजाचा पाठिंबा राहील, पण हा मोर्चा लव जिहाद विरोधी जन आक्रोश मोर्चा असावा, मुस्लिम समुदाय विरोधात नसावा, असेहीआवाहन कोल्हापुरातील मुस्लिम समाजाचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
त्यामुळे कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या लव जिहाद विरोधी जनआक्रोश मोर्चाला कोल्हापूरच्या समस्त मुस्लिम समाजाचा पाठिंबाच असेल, पण या मोर्चाचे आयोजन करताना मुस्लिम समुदाय विरोधात कोणतीही भूमिका संयोजकांच्या वतीने घेतली जाऊ नये, असे आवाहन हाजी अस्लम सय्यद यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.
प्रत्येक चांगल्या निर्णयाच्या बाजूने POSITIVVE WATCH ची साथ राहील.. -सकारात्मक विचारासाठी एक पाऊल पुढे
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.










































































